Pune ZP News: ऐतिहासिक निर्णय! पुणे ZP शाळांमध्ये खासगी परीक्षांना बंदी; गावातच मिळणार उच्च शिक्षण

Pune Zilla Parishad schools private exams ban News: औद्योगिक वसाहतींमुळे वाढलेले स्थलांतरित कामगारांचे प्रमाण आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पायपीट करत दूरवर जावे लागणारी अडचण लक्षात घेऊन हा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Zilla Parishad
Pune Zilla Parishad Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर गेल्या महिनाभरात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत शिक्षणाच्या संदर्भात एक अतिशय धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि क्रीडा समितीची ही महत्त्वपूर्ण बैठक उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वळसे-पाटील यांनी सांगितले की, शहरालगतच्या गावांमध्ये वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहतींमुळे वाढलेले स्थलांतरित कामगारांचे प्रमाण आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पायपीट करत दूरवर जावे लागणारी अडचण लक्षात घेऊन हा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या पाचवीपर्यंत असलेल्या सर्व शाळांचे वर्ग आता इयत्ता आठवीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला असून, ज्या शाळा सध्या आठवीपर्यंत सुरू आहेत, त्यांचे वर्ग आता दहावीपर्यंत विस्तारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय त्यांच्या गावातच होणार आहे.

Pune Zilla Parishad
Divyang Employees News: राज्य सरकारचा मोठा निर्णय! जनगणना कामातून दिव्यांगांना सूट

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३५२१ प्राथमिक शाळा असून त्यात सुमारे २ लाख ३८ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पाचवीपर्यंतच्या ३४५ तर आठवीपर्यंतच्या ११० शाळा आहेत, ज्यांचा दर्जा आता उंचावला जाणार असून तेथे पुढील वर्ग सुरू केले जातील.

Pune Zilla Parishad
Who is K Vijay Dhamu: रिक्षा चालक ते आमदार! दोन बड्या नेत्यांना आस्मान दाखवणारे विजय धामू कोण?

आता खाजगी परीक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाही

शिक्षण समितीने खासगी संस्थांच्या शाळांमधील हस्तक्षेपालाही चाप लावला आहे. शाळांमध्ये शासनाकडून आयोजित परीक्षा आणि जिल्हा परिषदेच्या अधिकृत परीक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी संस्थांच्या परीक्षा आयोजित करण्यास या बैठकीत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Pune Zilla Parishad
Nasrapur girl case: नसरापूर अत्याचार प्रकरण! पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड; चिमुरडीच्या तोंडात आढळला सॉक्स

रिक्त पदांचा प्रश्न सुटला!

या महत्त्वपूर्ण ठरावामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांवर लादल्या जाणाऱ्या बाह्य परीक्षांना आता लगाम बसणार आहे. दरम्यान, या पहिल्याच बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांनी 'मॉडेल स्कूल'च्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. जिल्ह्यातील ३०३ मॉडेल स्कूलचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षक संवर्गातील पदोन्नती आणि रिक्त पदांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com