maharashtra sadan sarkarnama
महाराष्ट्र

maharashtra sadan : मोठी बातमी! महाराष्ट्र सदनावर दहशतवादी सावट? बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली पोलीस ॲक्शन मोडमध्ये!

maharashtra sadan delhi bomb threat : देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब स्फोटाच्या धमक्या दिल्या जात असून हे सत्र अद्याप थांबलेले नाही. यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aslam Shanedivan

  1. महाराष्ट्र सदन येथे ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली.

  2. दिल्ली पोलिस यांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करून संपूर्ण परिसराची तपासणी केली.

  3. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवून इमारत हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

Delhi Bomb Threat News : देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आज पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ल्यासह दिल्लीतील शाळांना आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत धौला कुआं येथील आम पब्लिक स्कूलमध्ये एक मेल आला असून त्यात ही धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या मेलमध्ये महाराष्ट्र सदनाला देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून तपास यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या दिल्या जात होत्या. आज (23 फेब्रुवारी) सकाळी धौला कुआं येथील आम पब्लिक स्कूलमध्ये सकाळी ७ वाजताच्या सुमारास धमकीचा असाच एक ईमेल आला. ज्यात सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी दिल्ली विधानसभा लाल किल्ल्यासह महाराष्ट्र सदनाला लक्ष करत बॉम्बस्फोट केला जाणार असल्याचे सांगितले होते.

मेलची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने तात्काळ उत्तर जिल्हा पोलिसांना याची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी विधानसभा आणि लाल किल्ल्याभोवतीचा परिसर तातडीने घेराव घातला. तसेच महाराष्ट्र सदनाची सुरक्षा वाढवली. दरम्यान या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले असून शोध मोहिमेनंतर आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही.

दरम्यान पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून या ईमेलच्या स्रोताचा शोध घेण्यात येत आहे. तसेच ही अफवा होती की कट याचा देखील तपास पोलिस करत आहेत. पण गेल्या काही आठवड्यांत राजधानीतील अनेक संस्थांना मिळालेल्या या खोट्या कॉल्स आणि ईमेलमुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर सततच्या अशा धमक्यांमुळे येथे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सध्या महाराष्ट्र सदनाची सुरक्षा वाढवण्यात आली असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे इतर मंत्र्यांचे थांबण्याचे अधिकृत ठिकाण आहे. यामुळे आता धमकी मिळताच कोणत्याही संभाव्य धोक्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कसून तपासणी करत आहेत.

FAQs :

1. महाराष्ट्र सदनाला धमकी कशी मिळाली?
ईमेलद्वारे बॉम्बची धमकी पाठवण्यात आली.

2. पोलिसांनी कोणती कारवाई केली?
दिल्ली पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन राबवून संपूर्ण परिसराची तपासणी केली.

3. सध्या परिस्थिती काय आहे?
इमारत हाय अलर्टवर ठेवण्यात आली असून तपास सुरू आहे.

4. महाराष्ट्र सदनाचा उपयोग कशासाठी होतो?
दिल्ली दौऱ्यावर येणाऱ्या राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर केला जातो.

5. धमकी खोटी असल्याची शक्यता आहे का?
तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, सध्या सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT