Maharashtra Politics : भाजप नेत्याचा सुनेत्रावहिंनींना थेट सल्ला, अजितदादांच्या खास शैलीचा दाखला देत म्हणाले, 'धार आणा, ठाम भूमिका घ्या!'

chandrakant patil advice to DCM sunetra pawar : दिवंगत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रशासनावर पकड मतबूत केली होती. पण आता त्यांच्या जाण्याने प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
chandrakant patil, DCM sunetra pawar and late Ajit Pawar, deputy CM Maharashtra
chandrakant patil, DCM sunetra pawar and late Ajit Pawar, deputy CM Maharashtrasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कोकण दौऱ्यावर पावस येथे विश्रांतीसाठी आले आहेत.

  2. त्यांनी सुनेत्रा पवार यांना प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण करण्याचा सल्ला दिला.

  3. अजित पवार यांच्या कामकाजाच्या शैलीचा उल्लेख करत प्रशासन प्रभावीपणे हाताळण्यावर त्यांनी भर दिला.

Ratnagiri News : निवडणुकांच्या धावपळीतून विसावा घेण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलो. प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही, त्यासाठी अजित पवार यांनी आपल्या कामातून प्रशासनात एक आदरयुक्त भीती निर्माण केली तशीच भीती तुम्हालाही निर्माण करावी लागेल, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला. तीन महिन्यांपासून निवडणुकांच्या धामधुमीत व्यस्त असलेले मंत्री चंद्रकांत पाटील सध्या दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी पावस येथे आले आहेत. या वेळी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, ‘सांगली महापालिकेत शिवसेनेच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या याद्यांमुळे युती झाली नाही उलट भाजपला पाडण्याचे काम झाले. राजकारणात संधी महत्त्वाची असते. अजित पवार यांनी १६ नगरसेवक दिले म्हणून आम्ही त्यांना उपमहापौरपद दिले, दोन नगरसेवक असणाऱ्यांना काय देणार? असा सवाल उपस्थित करत "कोणी कोणाला फसवले याचा १० वर्षांचा इतिहास पाहिला तर प्रत्येकाने कोणाला तरी फसवले आहेच, असा टोला त्यांनी लगावला.’

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन फसलेले नाही, अशी भूमिका घेत पाटील यांनी सकारात्मक भाष्य केले. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटनुसार अनेक कुणबी नोंदी मिळाल्या आहेत हे मान्य करत त्यांनी सांगितले की, एका नोंदीमुळे ३०० प्रमाणपत्रे निघू शकतात; मात्र, या नोंदी वैयक्तिक स्तरावर कशा न्यायच्या हा कायदेशीर विषय असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे. अंतर्गत वादात इतरांनी पडण्याची गरज नाही. ते त्यांचे प्रश्न स्वतः सोडवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

chandrakant patil, DCM sunetra pawar and late Ajit Pawar, deputy CM Maharashtra
Sharad Pawar यांचे नेते Sunetra Pawar यांच्या भेटीला, काय शिजतंय?।Pune News

घुसखोरांवर कारवाई झाली पाहिजे

पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर पाटील यांनी अत्यंत गंभीर विधान केले. ‘पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ९० टक्के फेरीवाले बांगलादेशी आहेत. हे लोक स्थानिक मुलींशी गैरवर्तन करतात आणि त्यातून ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार घडतात,’ असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घुसखोरांवर कारवाईचे जे आदेश दिले आहेत त्याचे स्वागत करत घुसखोरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांनी मुळापर्यंत जावे

रोहित पवार यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांवर पाटील म्हणाले, त्यांनी केवळ माध्यमांसमोर आरोप न करता सत्य शोधण्यासाठी मुळापर्यंत जावे. संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करायला हवा तर त्यातून काहीतरी पुढे येईल. माध्यमांपुढे मांडून त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

chandrakant patil, DCM sunetra pawar and late Ajit Pawar, deputy CM Maharashtra
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्षानंतर सुनेत्रा पवारांवर आणखी एका मोठ्या संस्थेची जबाबदारी येणार

FAQs :

1. चंद्रकांत पाटील कोठे आले आहेत?
ते दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी कोकणातील पावस येथे आले आहेत.

2. त्यांनी सुनेत्रा पवारांना काय सल्ला दिला?
प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण करून प्रभावी नेतृत्व करावे, असा सल्ला दिला.

3. अजित पवारांचा उल्लेख का करण्यात आला?
अजित पवार यांच्या कामकाजाच्या शैलीमुळे प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण झाल्याचा संदर्भ देण्यात आला.

4. हा संवाद कधी झाला?
पावस येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

5. हा दौरा कोणत्या पार्श्वभूमीवर आहे?
तीन महिन्यांच्या निवडणूक धामधुमीनंतर विश्रांतीसाठी हा दौरा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com