Maharashtra School Students sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : सरकार करणार २० लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी देणार मोफत चष्मे; पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Maharashtra Government free Eye Checkup And Glasses for Students Project : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Free Eye Checkup Project News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन’ यांच्यात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमातून दृष्टिदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, ‘रत्ननिधी ट्रस्ट’चे विश्वस्त राजीव मेहता, ‘वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन’चे संचालक वेणू अंबाती उपस्थित होते.

काहीच दिवसांआधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला. तर यासाठी १७४ कोटी १९ लाख ३५ हजार ४२४ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता दिली होती.

यानंतर आता डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमातून दृष्टिदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या करारानुसार राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत ६२ हजारांवर चष्मेवाटप

२०१९ पासून या उपक्रमाद्वारे १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमधील सहा लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ६३ हजारांहून अधिक चष्मे पुरविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या नेत्रविकारांचे आणि तक्रारींचे वेळेत निदान होण्यास आणि त्यावर उपचार होण्यास मदत होणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध झाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT