Maharashtra Voter List Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra SIR Voter List : SIR मध्ये शेख, खान, पाटील, पवार आडनावांना मोठा फटका! महाराष्ट्रातील मतदार यादीची धक्कादायक आकडेवारी

Maharashtra SIR report reveals deleted voter surname data, with Sheikh, Patil, Khan and Pawar among the most common. Find out how 190 assembly seats are affected : वगळलेल्या मतदारांमध्ये शेख आडनावाचे सर्वाधिक 7.54 लाख मतदार; पाटील, खान आणि पवार आडनावांचाही मोठ्या संख्येने समावेश, SABAR Institute च्या अभ्यासातून माहिती समोर

Pradeep Pendhare

Maharashtra Voter List : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल तपासणी (SIR) मोहिमेत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वगळलेल्या आडनावांमध्ये शेख, खान, पवार, पाटील यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या मोहिमेचे वगळलेल्या मतदारांबरोबरच, 190 विधानसभा मतदारसंघांना फटका बसला आहे. वगळलेल्या मतदारांची संख्या पाहिल्यास ती विजय आमदारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यात एसआयआर मोहीम सुरू करण्यापूर्वी एकूण 9.78 कोटी मतदार होते. त्यातून 2 कोटी 6 लाख 88 हजार 421 मतदार वगळले. या वगळलेल्या मतदारांपैकी तब्बल 83 लाख 2 हजार मतदार जिवंत आहेत. ही मतदार का वगळले याचे निवडणूक आयोग ठामपणे स्पष्टीकरण देत नाही. पण यात धक्कादायक बाब म्हणजे, वगळलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक शेख, खान, पवार आणि पाटील अडनावे असलेली आहेत.

राज्यात 5 लाख 66 हजार अडनावांमध्ये सर्वाधिक वगळलेले शेख अडनाव असलेली मतदार (Voter) आहेत. जवळपास 7.54 लाख वगळलेल्या शेख अडनावांचे मतदार आहेत. त्या खालोखाल पाटील अडनावांचे, 4.84 लाख मतदार, खान अडनाव असलेले 3.69 लाख मतदार आणि पवार अडनाव असलेले 2.75 मतदारांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या एसआयआर कार्यक्रमाचा वगळलेल्या मतदारांनाच फटका बसला नसून, तो राज्यातील 190 विधानसभा मतदारसंघांना बसला आहे. वगळलेल्या मतदारांची संख्या 2024च्या निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहे. तर 95 विधानसभा मतदारसंघात मिळून न आलेले मतदार किंवा अनुपस्थित मतदारांची संख्या विजयी आमदारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे.

महाविकास आघाडीला 2024च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या मतदारसंघातून तब्बल 18.5 टक्के, तर महायुतीने जिंकलेल्या मतदारसंघातून 17.6 टक्के मतदार वगळलेली आहे. त्यामुळे विशिष्ट राजकीय लक्ष्य ठेवून निवडणूक आयोगाने एसआयआरची कार्यवाही केल्याचे स्पष्ट होत नाही.

एसआयआर मोहिमेबाबत निवडणूक आयोगाने पूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे की, ही मोहीम कोणत्या विशिष्ट जाती-धर्माला धरून राबवण्यात आलेली नाही. यावरून देशात विरोधकांकडून गोंधळ घातला जात असल्याने निवडणूक आयोगाने मतदार यादीत वगळलेली नाव समाविष्ट करण्यासाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

SCROLL FOR NEXT