Rupali Chakankar Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्याला सात महिने पूर्ण; महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, आयोगाला नवा अध्यक्ष कधी मिळणार..?

The Maharashtra State Commission for Women : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 20 मार्च 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.

Deepak Kulkarni

Nashik News: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि बलात्कार तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर रुपाली चाकणकर यांचेही खरात प्रकरणात काही फोटो व व्हिडिओ समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर विरोध पक्षांतील नेतेमंडळींकडून कडाडून टीका केली जात होती. या टीकेनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 20 मार्च 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. मात्र,चाकणकरांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला आता सुमारे सात महिने पूर्ण झाली आहेत.तेव्हापासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे.

एकीकडे राज्यातील महिला अत्याचार,छेडछाड,अपहरण,हत्या,बलात्कार,सोशल मीडियावरील बदनामी,कौटुंबिक हिंसाचार, आर्थिक फसवणूक यांसह विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव लपून राहिलेले नाही. या गुन्हेगारी घटनांमुळे महिलांच्या सुरक्षितेतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तसेच आयोगाकडे जवळपास 2700 प्रकरण प्रलंबित असल्याची माहितीही समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावरही राजकीय गंभीर आरोप झाल्यानं त्यांनी आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं होतं. त्यांच्यानंतर आजतागायत राज्य सरकारने राज्य महिला आयोगाला नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केलेली नाही. अध्यक्षांची अधिकृत वा प्रभारीही नियुक्ती न केल्यामुळे हे राज्यातील महिलांबाबतचे महत्त्वाचे पद अद्यापही रिक्त असल्यानं विरोधकांकआहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

महिला आयोगाला अध्यक्ष आणि सदस्य नसल्यामुळे महिलांशी संबंधित हजारो प्रकरणं विना सुनावणी निर्णय रखडले आहेत. हे पद एक निम-न्यायिक संस्था मानलं जातं आहे. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यानं सर्व कामं ठप्प झाले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी अनेक नावांचा चर्चा सुरू आहे. यात डॉ. ज्योती मेटे, प्रतिभा शिंदेंसह काही राजकीय नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. त्यात भर म्हणजे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीच्या अफवाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT