Maharashtra Political News : राज्याचे वित्तमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 94 कोटी 889 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत.
या पुरवण्या मागण्यात महिला आणि बाल विकास खात्याला सर्वाधिक 26 हजार 273 कोटींची, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी Ladaki Bahin Yojana 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेसाठी 5 हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतील Lok Sabha फटका महायुतीने जरा जास्तच सिरियस घेतल्याचे दिसत आहे. त्यावर वारंवार वेगवेगळे विश्लेषण करून एकीकडे आपल्या पक्षातील लोकांना दिलासा दिला जात आहे. तर दुसरीकडे मतदारांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे सत्ताधाऱ्यांचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
त्याचाच एक भाग म्हणजे आता सादर केलेला अर्थसंकल्प. यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांची आतषबाजी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर तब्बल 94 हजार 889 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्याही विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत.
जुलैमध्ये विधिमंडळात सादर केलेल्या 94 कोटी 889 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या असल्या तरी 88 हजार 770.64 कोटी एवढा निव्वळ भार असणार आहे. यातील 17 हजार 334 कोटीच्या अनिवार्य, 75 हजार 39 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत आणि 2 लाख 515 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - 25000
महानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास - 6000
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना व राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजन - 5555
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - 5060
सन २०२३ च्या खरीप हंगामामधील विविध नैसगिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य (कापूस व सोयाबीन) - 4194.68
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन व संजय गांधी निराधार अनुदान योजना - 3615.94
अमृत २.० अभियानासाठी तरतूद - 3526.00
मुख्यमंत्री बळीराजा बोज सवलत योजनाअंतर्गत मोफत वीज - 2930
१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनुदान - 2323
पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोनसाठी - 2265
पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांच्या मानधनासाठी - 1893.24
परिवहन विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालय आणि एसटीला विशेष अर्थसहाय्य - 1879.97
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 1400.14
विभाग महिला व बाल विकास विभाग - 26273.05
नगर विकास विभाग - 14595.13
कृषि व पदुम विभाग - 10724.85
कौशल्य विकास व उद्योजगता विभाग - 6055.50
सार्वजनिक बांधकाम विभाग - 4638.82
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग - 4395.38
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - 4316.92
सार्वजनिक आरोग्य विभाग - 4185.34
गृह विभाग - 3374.08
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग - 3003.07
इतर मागास बहूजन कल्याण विभाग - 2885.09
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.