Jayant Patil On BJP : सरकारमधील आमदाराचा 'प्रताप'! चक्क मृतांवरच उपचार; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Jaykumar Gore Corruption in Covid : अभिनेता अक्षय कुमार याच्या गब्बर चित्रपटातील मृत व्यक्तिवर उपचाराच्या सीनप्रमाणेच खटावच्या मायणीतील वैद्यकिय महाविद्यालयात प्रकार घडल्याचे सांगितले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Maharashtra Political News : कोविड काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांतून एकीकडे ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली, दुसरीकडे मात्र अशा प्रकरणातील सत्ताधारी नेत्यांना सूट दिली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधिमंडळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप माण-खाटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोविडमध्ये तब्बल 250 मृतांवर रुग्ण म्हणून उपचार करून सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला. त्याला गोरे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. या आरोपांनी मात्र साताऱ्यासह राज्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी जयंत पाटील Jayant Patil यांनी अभिनेता अक्षय कुमार याच्या गब्बर चित्रपटाची आठवण करून दिली. त्यातील सीनप्रमाणेच खटावच्या मायणीतील वैद्यकिय महाविद्यालयात प्रकार घडल्याचे सांगितले. यात जयकुमार गोरे यांनी कोविड काळात मोठा घोटाळा करत चक्क मृत रुग्णांवरच उपचार केल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील खटावमधील मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर रूग्णालयात कोविड काळात 200 ते 250 रुग्णांवर 10-12 दिवस ठेवले. हा प्रकार तीन ते साडेतीन महिने सुरू होता. त्यातून राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा गैरफायदा घेतला. यात संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजीनदार यांनी आर्थिक फायद्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता.

या रुग्णालयाने योजनेसाठी करार करताना बोगस डॉक्टर दाखवले. रुग्णालयात कार्यरत नसलेल्या डॉक्टरांनी मृत रुग्णांवर उपचार केल्याचे दाखवले. मृत रुग्ण बरा झाल्याचे दाखवून त्यांच्या डिस्चार्ज पेपरवर खोट्या सह्याही घेतल्या. त्यांना परतीच्या प्रवासाचे ५० रुपयांचा लाभही दिला. तसेच मृत रुग्णांचे समाधान पत्रही भरून घेतले, हा सर्व प्रकार जयंत पाटील यांनी काही उदाहरणे देत कागदपत्रे दाखवून विधिमंडळात सांगितले.

Jayant Patil
Worali Hit And Run Case Update : वरळी हिट अ‍ॅन्ड प्रकरणी मोठी बातमी! मुख्य आरोपी फरार मिहीर शाहाला अखेर अटक

हा प्रकार आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी केल्याचा थेट आरोप करत जयंत पाटील यांनी या प्रकरणासंबंधी चौकशी समिती नेमण्याचा आग्रह धरला. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली. त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी जयंत पाटलांवर त्याच शब्दात पलटवार केला.

जयकुमार गोरे म्हणाले, चौकशीच्या समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनाच करावे. ज्येष्ठ सदस्य असलेल्या पाटील यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन बोलायला हवे होते. त्यांना ज्यांनी ही माहिती दिली त्यांच्या कारकीर्द त्यांनी पाहायला हवी होती. त्यांच्या कारनाम्यावरही त्यांनी सभागृहात प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्या समितीचे अध्यक्ष पाटील यांना नेमा. ते देतील त्या अहवालानंतर कारवाई करा, असे आवाहनही जयकुमार गोरे यांनी केले.

नेमका काय आरोप?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी केलेल्या करारनाम्यात अनेक बोगस डॉक्टरांची नावे दाखविण्यात आली.

ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्षात कुठल्याही रूग्णांवर उपचार केले नाहीत त्या 46 डॉक्टरांची बोगस नावे करारनाम्यात घुसवून स्वत:च्या फायद्यासाठी सरकारची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली.

कोरोना उपचार केंद्र म्हणून रूग्णालयात ताब्यात घेतल्यानं सरकारनं एक कोटी रूपयांची औषधे, इंजेक्शन पुरवली होती.

Jayant Patil
Supreme Court : बाहेर जाता की मार्शल बोलवू! राहुल गांधींविरोधात याचिका करणाऱ्या वकिलाला सुप्रीम कोर्टाने झापले...

कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसेही दिले होते, असं असतानाही बोगस रूग्णांची नोंदणी करून महात्मा फुले जन आरोप योजनेचा गैरलाभ उठवला.

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या 200 हून अधिक रूग्णांना दोन-तीन महिन्यानंतर पुन्हा जिवंत दाखवले आणि ते रूग्णालयात दाखल असल्याची नोंद करून विविध सरकारी योजनांतर्गत उपचाराचे कोट्यवधी रूपये लाटले.

संस्थेचा कोणताही ठराव न करता बोगस लेटरहेड, बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट बँक खाते उघडले आणि गैरव्यवहाराचे पैसे वळते केले.

कोरोनाचा साधारण संसर्ग झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देताना 'आयसीयू'च्या बेडवर झोपवले आणि कोरोना उपचाराच्या रमकेचे पैसे लाटण्यात आले.

रूग्णालयात सात व्हेंटिलेटर होते. त्यामुळे महिन्यात फक्त 21 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेऊ शकत होते. पण, त्याठिकाणी 150 ते 200 रूग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बोगस नोंदी केल्या.

Jayant Patil
Pramod Sawant Government Cabinet Expansion : गोवा मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, 3 नव्या चेहऱ्यांना संधी ? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com