Kolhapur News, 27 Aug : विदर्भात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक मान्यतेच्या खळबळजनक प्रकरणानंतर आता राज्यभर माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांच्या मान्यता प्रकरणांची तपासणी करण्यासाठी 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर सह पाच जिल्हे आता एसआयटीच्या रडारवर आहेत.
आजपासून दोन दिवस कोल्हापूर सांगली सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील मान्यता प्रकरणाची चौकशी होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विदर्भात शिक्षण मान्यतेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.
मात्र या प्रकरणाचे जाळे राज्यभर असल्याचे लक्षात येतात त्यावर 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली होती. सध्या राज्यभर शिक्षक मान्यता प्रकरणाची चौकशी सुरू असून आता त्यांचा मोर्चा कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांकडे वळाला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना नोकऱ्या दिल्याचे मोठे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात चौकशीचा ससेमीरा लागला आहे.
यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांचा समावेश असून या पाच जिल्ह्यातील मान्यतांच्या प्रकरणांची आजपासून दोन दिवस तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतची पूर्व कल्पना दिल्यानंतर या पाचही जिल्ह्यात गेल्या आठवडापासून मान्यता प्रकरणांच्या फाइल्स संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
राज्यभरातील २०१९ ते २०२५ या कालावधीत ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे. अशा सर्वच मान्यता प्रकरणांची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी मान्यता प्रकरणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तपासात आणखीन काही प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.