Shalarth ID Scam : महाजनांच्या निकटवर्तीयाला 160 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक, पण एकदाही तुरुंगात नेलं नाही, आता रुग्णालयातूनच जामीन मिळणार?

Sanjay Garud Bail Hearing : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी संजय गरुड यांना अटक केल्यापासून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चित्र आहे. त्यांना एकदाही पोलीस कोठडीत नेण्यात आलेलं नाही. पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या आठवड्यात नाशिक रोडच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Shalarth ID scam case in Nashik court
Shalarth ID ScamSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 27 Aug : राज्यभर गाजलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज सुनावणी अपेक्षित आहे. त्यामध्ये भाजप नेता अटक झाल्यावर थेट रुग्णालयात दाखल झाला. त्यामुळे त्याला जामीन मिळणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

राज्यभर बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण गाजते आहे. 233 शाळांतील 821 बनावट शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न आहे. या नियुक्त्यांसाठी बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय भाजप नेते संजय गरुड हे आरोपी आहेत. संजय गरुड यांनी 12 बनावट शाळांची नोंदणी केली होती.

शाळांतील बनावट नियुक्त्या व अनुदान लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप नेते संजय गरुड हे राजकीय दृष्ट्या प्रभावी व्यक्ती आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने पोलिसांच्या तपासावर राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गरुड यांना अटक केल्यावर थेट रुग्णालयात दाखल केले होते.

Shalarth ID scam case in Nashik court
Narhari Zhirwal : मंत्री झिरवळांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची थट्टा? म्हणाले, 'खाऊन-पिऊन आंदोलन करा...'; संतप्त विद्यार्थ्यांनी जागेवरच सुनावलं

संजय गरुड यांना अटक केल्यापासून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चित्र आहे. त्यांना एकदाही पोलीस कोठडीत नेण्यात आलेलं नाही. पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या आठवड्यात नाशिक रोडच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व विशेष तपास पथकाचे उपायुक्त संदीप मिटके यांनी विविध आरोपींना अटक केली होती. भाजप नेता संजय गरुड याला सोलापूर येथील फार्म हाऊसमधून अटक झाली होती.

Shalarth ID scam case in Nashik court
Devendra Fadnavis : कुंभमेळा भूसंपादन वाद पेटला! फडणवीस नाशिकमध्ये येताच शेतकरी आक्रमक; थेट पोलीस ठाण्यात ठिय्या

गुन्हे शाखेने धुळ्यातील प्रशांत वाडीले शशिकांत हिंगोलीकर तसेच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेल्या गरुड आणि त्यांचे बंधू व संस्थेचे सहसचिव दीपक गरुड या राजकीय व्यक्तींना अटक केली आहे. याशिवाय नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता भाऊसाहेब चव्हाण मीनाक्षी गिरी प्रदीप शिंगणे अतुल पवार राहुल पवार यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन यापूर्वीच न्यायालयाने फेटाळले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com