Maharashtra Online Attendance for Teachers AI
महाराष्ट्र

Teacher Online Attendance: शाळांमध्ये आता गुरुजींवर डिजिटल वॉच! ऑनलाईन हजेरी अनिवार्य; नियम मोडल्यास थेट कारवाई

Maharashtra Online Attendance for Teachers:महाराष्ट्रात पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी स्विफ्टचॅट ॲपवर ऑनलाइन हजेरी अनिवार्य. नियम, हजेरीची वेळ आणि कारवाईची माहिती जाणून घ्या.

Mangesh Mahale

Maharashtra Online Teacher Attendance: सरकारी असो वा खाजगी, कामाच्या ठिकाणी वेळेचे भान राहावे यासाठी बायोमेट्रिक किंवा 'फेस रीडिंग'द्वारे डिजिटल हजेरी घेण्याची पद्धत आता शिक्षण क्षेत्रातही लागू करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन हजेरीची सक्ती केली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तालयाकडून आदेश काढण्यात आला आहे.

ऑनलाईन हजेरीची प्रक्रिया आणि वेळापत्रक

शिक्षकांना आपल्या मोबाईलमध्ये 'स्विफ्टचॅट' (SwiftChat) हे ॲप डाऊनलोड करून त्यावर उपस्थिती नोंदवावी लागेल. मोबाईल क्रमांक OTP द्वारे व्हेरीफाय केल्यानंतर ॲपमधील 'स्मार्ट हजेरी बॉट' सुरू करावा लागेल. यामध्ये शाळेचा ११ अंकी युडायस (UDISE) कोड टाकून शिक्षकांना आपला शालार्थ किंवा राष्ट्रीय शिक्षक संकेतांक नोंदवावा लागेल. 'शिक्षक हजेरी' या पर्यायातून उपस्थित, गैरहजर, अर्धी रजा, पूर्ण रजा किंवा प्रशिक्षण अशा विविध नोंदी करता येतील.

सकाळी ९ ते १२ आणि सकाळी १० ते सायंकाळी ५ या शाळेच्या वेळांनुसार हजेरी नोंदवणे अनिवार्य आहे. शालार्थ प्रणालीवर माहिती असलेल्या शाळांनी शालार्थ क्रमांक वापरावा, तर इतर शाळांनी युडायस प्लसवरील राष्ट्रीय शिक्षक संकेतांकापूर्वी 'NT' हा उपसर्ग लावून नोंदणी पूर्ण करायची आहे.

विद्यार्थ्यांची हजेरीही याच ॲपवर

केवळ शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती देखील याच ॲपद्वारे नोंदवली जाईल. वर्गशिक्षकांना 'विद्यार्थी हजेरी' पर्यायाचा वापर करून आपापल्या तुकडीतील गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करून अहवाल तयार करता येईल.

गैहजर राहिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास कारवाई

शालेय शिक्षण क्षेत्रात पूर्ण पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन प्रणालीवर शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक प्रत्यक्ष लक्ष ठेवणार आहेत. ज्या शाळा किंवा शिक्षक नियमित ऑनलाईन हजेरी नोंदवणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिक्षकाला वेळेत ऑनलाईन हजेरी लावणे बंधनकारक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT