CM Fadnavis on Maharashtra Startups Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Top in Startup : देशातील एकूण 'स्टार्टअप्स'पैकी सर्वाधिक केवळ महाराष्ट्रात!

CM Fadnavis on Maharashtra Startups : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र आता थांबणार नाही ; महाराष्ट्र हे स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला संचालक असलेले राज्य बनले आहे.

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Startup News : महाराष्ट्रासाठी एक अभिनानस्पद बातमी समोर आली आहे. स्टार्टप क्षेत्रात महाराष्ट्र आता देशभरातून अव्वल स्थानावर आहे. कारण, देशभरातील एकूण स्टार्टअप्सपैकी १७.७५ टक्के स्टार्टअप्स एकट्या महाराष्ट्रातच आहे.

DPIIT-२०२४ नुसार महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या २७,०१४ आहे. तर त्या पाठोपाठ कर्नाटक - १६ हजार ९३, दिल्ली - १५ हजार ६४, उत्तर प्रदेश - १४ हजार ४२९ आणि गुजरात -१२ हजार ५४० अशी आकडेवारी समोर आली आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी अधिक माहिती देताना हेही म्हटले की, मान्यताप्राप्त स्टार्टअप मार्फत थेट रोजगार निर्मितीत महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. देशातील स्टार्टअप मार्फत थेट रोजगार निर्मितीपैकी १८.२३ टक्के रोजगार निर्मिती एकट्या महारष्ट्रात झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र - ३,०४,०७८ कर्नाटक- १,८६,३५२ दिल्ली - १,७८,७९८ गुजरात - १,५०,०६५ आणि उत्तर प्रदेश - १,४८,६७७

स्टार्टअप्स ईकोसिस्टिम नेतृत्त्वात महाराष्ट्राच्या नारीशक्तीचा डंका...! -

देशभरातील विविध स्टार्टअप्स ईकोसिस्टिममधील, महिलांच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आजघडीला महाराष्ट्रात देशात सर्वाधिक महिला संचालित स्टार्टअप्स आहेत.

तसेच राज्य शासन यासंदर्भात एक अभियान देखील सुरू करत आहेत, ज्याद्वारे अधिकाधिक नारीशक्तीचा सहभाग आणि नेतृत्त्व या क्षेत्रात वाढले पाहिजे. याच अनुषंगाने 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025' कार्यक्रमात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने' अंतर्गत विजेत्या महिला उद्योजिकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT