Sudhir Mungantiwar on Ganga Bath : गंगा स्नानावर मुनगंटीवार असं नेमकं काय म्हणाले होते, ज्याने उंचावल्या अनेकांच्या भूवया!

Sudhir Mungantiwar Statement : ...अखेर मुनगंटीवार यांनी स्वत:च आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला ; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar at Chandrapur : मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक वक्तव्यावर सर्वांचे लक्ष आहे. मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते. आपल्या भाषणातून आणि बोलण्यातून वेगवेगळ्या उपमा आणि उदाहरणे देताना ते आपल्या नाराजीचा योग्य ठिकाणी संदेश देताना दिसतात . सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू असताना केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता दिसताच त्यांनी लगेच खुलासा करून आपली बाजू सावरली.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वातावरण बदलावर जागतिक परिषद सुरू आहे. या परिषदेत बोलताना मुनगंटीवार यांनी गंगा स्नान केल्याने त्वचा रोग होतो असे आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवचा उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी या कुंभमेळ्याची भव्यदिव्य अशी तयारी केली आहे. भाजपच्यावतीने कुंभमेळ्याचे चांगलेच ब्रँडिंग केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने भाजपचे नेते नाराज होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे लक्षात घेऊन आपल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांनी(Sudhir Mungantiwar) लगेच खुलासा केला. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात क्लायमेट चेंज या विषयावर जागतिक परिषद सुरू आहे. यात वायू प्रदूषण, जल प्रदूषणावर चिंतन आणि मंथन केले जात आहे. गंगा स्नान केल्याने काही लोकांना त्वचेचे आजार झाल्याच्या बातम्या आपल्या वाचनात आल्या होत्या. या माहितीच्या आधावर मी गंगा स्नानावर मत व्यक्त केले. मात्र माझे वक्तव्य मोडतोड करून काही माध्यमांनी दाखवले.

Sudhir Mungantiwar
Andhra Pradesh Government : निवडणूक लढवायची? तर मग तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं हवीत ; आंध्रप्रदेशात लागू होणार अजब नियम!

तसेच, पाण्याचा दर्जा उत्तम ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण मानव समाजावर आहे. या अनुषंगाने आपण आपले वक्तव्य केले होते. त्याचा गंगा स्नान आणि कुंभमेळ्यात शाही स्नानाशी काही संबंध नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar
Kirit Somaiya target Supriya Sule : ''EDची नोटीस आली तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळे यांच्यासोबत...'' ; किरीट सोमय्यांचं विधान!

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात साधू, संतांसह कोट्यवधी लोक शाही स्नानासाठी आले आहेत यात विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. संक्रातीच्या दिवशी तब्बल साडेतीन कोटी लोकांनी शाही स्नान केल्याचे वृत्त आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com