SIR list Sarkarnama
महाराष्ट्र

SIR revised schedule : महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! SIR चे सुधारिक वेळापत्रक जाहीर, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले...

Election Commission SIR new schedule Maharashtra : महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदारांनी कोणत्या तारखा आणि प्रक्रियेकडे लक्ष द्यावे, जाणून घ्या.

Rashmi Mane

महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला (SIR) सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्याने 19 ऑगस्ट 2026 रोजी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. SIR अंतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण झाली आहे. त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना आणि प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे मतदारांनी या यादीत आपले नाव आहे की नाही, याची तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 हा दावे आणि हरकती नोंदवण्याचा कालावधी असेल. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट झाले नसलेल्या नागरिकांना या काळात नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज क्रमांक 6 सादर करता येईल.

यानंतर 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 दरम्यान प्राप्त दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

त्यामुळे SIR मतदार यादी, प्रारूप मतदार यादी, मतदार यादीतील नाव, नवीन मतदार नोंदणी किंवा नावाबाबत हरकत असल्यास संबंधित नागरिकांनी सुधारित वेळापत्रक लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT