

Telangana Congress rift : तेलंगणा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये थेट मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनाच टार्गेट करण्यात आले आहे. राज्यातील कोंडा कुटुंब आणि रेड्डी यांच्यातील दरी वाढल्याची चर्चा आहे. त्याला रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील वनमंत्री कोंडा सुरेखा यांची लेक कारणीभूत ठरली आहे.
मंत्री सुरेखा यांची लेक कोंडा सुष्मिता यांनी मुख्यंमत्री आणि परकल मतदारसंघाचे विद्यमान आमदार रेऊरी प्रकाश रेड्डी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री रेड्डी यांनी नुकतेच आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत परकलसाठी पुन्हा विद्यमान आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून कोंडा गटामध्ये नाराजी पसरली आहे. सुष्मिता यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखविली.
आईच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुष्मिता यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. परकल मतदारसंघासाठी सुष्मिता यांच्याकडून तयारी करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गरज पडल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा इशाराही पक्षाला दिला. तुम्ही, तुमचा बाप अन् आजोबा आले तरी परकलची आमदार मीच असणार, असे आव्हान त्यांनी दिले आहे. पक्षामध्ये मागासवर्गीयांना मिळणाऱ्या असमान वागणुकीवरही त्यांनी बोट ठेवले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मागासवर्गीय नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप सुष्मिता यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सुष्मिता यांनी ऑक्टोबर २०२५ मध्येही मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या इतर नेत्यांवर टीका केली होती. आपल्या आईविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. काही नेते जाणीवपूर्वक मागासवर्गीय नेत्यांना टार्गेट करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर खासदार आणि शिस्तपालन समितीचे अध्यक्ष मालू रवी यांनी कोंडा सुरेखा यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी लेकीच्या विधानांवर खुलासा मागविला आहे. तीन दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोंडा कुटुंब विरुध्द मुख्यमंत्री असा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.