Maharashtra ZP Election 
महाराष्ट्र

Maharashtra ZP Election: लोकशाही की कुटुंबशाही? झेडपीतही नातलगांचीच चलती; जाणून घ्या कोणत्या नेत्यांची बायका-पोरं, पुतणे, भाचे आलेत निवडून

Maharashtra ZP Election: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये नगरपरिषदा, महापालिका निवडणुका पार पडल्या इथं घराणेशाहीची बरीच चर्चा झाली त्यानंतर आता झेडपी आणि पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर झाले या निवडणुकांमध्येही घराणेशाहीचा बोलबाला दिसून आला.

Amit Ujagare

Maharashtra ZP Election: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये नगरपरिषदा, महापालिका निवडणुका पार पडल्या इथं घराणेशाहीची बरीच चर्चा झाली त्यानंतर आता झेडपी आणि पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर झाले या निवडणुकांमध्येही घराणेशाहीचा बोलबाला दिसून आला. या निवडणुकीत कोणत्या नेत्यांची बायका-पोरं, पुतणे, भाचे आदी नातेवाईक मंडळी निवडून आली आहेत, जाणून घेऊयात.

झेडपीच्या निवडणुकीत प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नेत्यांच्या घरातल्या मंडळींना उमेदवाऱ्या देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी निवडणूनही आली आहेत. त्यामुळं राजकारणात घराणेशाहीबाबत होत असलेली चर्चा यंदाच्या झेडपीच्या निवडणुकीतही सुरुच असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे भारतातल्या राजकारणात वारंवार राजकारणातील घराणेशाहीवरुन आरोप-प्रत्यारोप होत असतानाच दुसरीकडं तिच लबाडी करण्यात मात्र आरोप करणारे लोक मागे नाहीत तर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

कोणा कोणाची बायका-पोरं होती निवडणुकीच्या रिंगणात?

  1. धाराशिवमधील जवळ्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवत काकाला मोठं आव्हान दिलं.

  2. गणोरीतून आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या निखिल चव्हाण विजयी,

  3. अंभईतून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र आमेर सत्तार विजयी.

  4. पाचोड्यातून खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे विजयी झाले आहेत.

  5. सोलापुरातील माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय. त्यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा केला पराभव.

  6. रायगडमध्ये आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांचा विजय,

  7. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले यांचा विजयी.

  8. कोल्हापुरात भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे शिंदे गटाकडून विजयी,

  9. राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांच्या वहिनी रोहिणी आबिटकर यांचा विजय.

  10. सांगलीच्या शिराळ्यात आमदार सत्यजीत देशमुख यांची मुलगी साईतेजस्वी देशमुख विजयी.

  11. माजी आमदार मानसिंग नाईक यांचे पुत्र विराज नाईक विजयी.

  12. तसंच माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सुनबाई राजेश्वरी रणधीर-नाईक विजयी.

  13. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या देखील विजयी झाल्या आहेत.

  14. तसंच सांगलीच्या कुंडलमध्ये आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेस लाड यांचा विजयी. त्यांनी आमदार अरुण लाड यांच्या सुनबाई धनश्री लाड यांचा पराभव केला.

  15. तर आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यांचा विजय झाला आहे.

  16. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील यांचा विजय झाला आहे.

एकाच कुटुंबातील पाचपैकी ४ जण पडले

दरम्यान, परभणीत माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जण यंदा झेडपीच्या निवडणुकीसाठी उभे होते. यांपैकी एकाचाच विजय झाला तर चार जण पराभूत झाले आहेत. यामध्ये मुलगा शमशेर वरपुडकर, मुलगी सोनल देशमुख, सून प्रेरणा वरपुडकर आणि आणखी एका नातेवाईकाचा पराभव झाला आहे. यामुळं परभणीकरांनी घराणेशाहीला स्पष्टपणे नकार दिल्याचं चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT