Sanika Awade: भाजप आमदार राहुल आवाडेंची कन्या सानिका आवाडे विजयी! चौथ्या पिढीचं दणक्यात स्वागत, उच्चांकी मतांनी विजय

Sanika Awade: पहिल्यांदाच झेडपीच्या निवडणुकीत एन्ट्री झालेली असली तरी सानिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची दावेदार असू शकते असं बोललं जात आहे.
Sanika Awade_Kolhaur ZP
Sanika Awade_Kolhaur ZP
Published on
Updated on

Sanika Awade: इचलकरंजीचे भाजपचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली आहे. कोरोची झेडपी मतदारसंघातून सानिकानं अर्ज दाखल केला होता. सानिकाच्या या विजयानंतर आवाडे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात यशस्वीरित्या दाखल झाली असून तिचं जनतेनं दणक्यात स्वागत केलं आहे.

Sanika Awade_Kolhaur ZP
zilla parishad result : तळकोकणात महायुतीच सत्तेवर, पण बंडखोरांनी शिवसेनेचे चार अन् भाजपचे दोन उमेदवारांना चारली पराभवाची धूळ

सानिका आवाडेचा १३,९७७ इतक्या उच्चांकी मताधिक्क्यानं विजय झाला आहे. सानिका आवाडे राहुल आवाडेंची कन्या आहे त्याचबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची होणारी सुनबाई आहे. पण सानिकाच्या या विजयामुळं आवाडे कुटुंबातील चौथ्या पिढीचं राजकारणात यशस्वी पदार्पण झालं आहे. जनतेनं ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्यानंतर आता सानिका आवाडे साथ दिली आहे.

Sanika Awade_Kolhaur ZP
Latur ZP election results : श्वास रोखणारा निकाल! जावा-जावांच्या लढाईत काँग्रेसचा दोन मतांनी डंका

नुकत्याच पार पडलेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सानिका आवाडेनं अनेक प्रभागांत प्रचाराची धुरा आपल्या अंगावर घेतली होती. त्यानंतर तिला भाजपनं जिल्हा परिषदेसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला. कोरोची मतदारसंघातून तिनं विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे गेल्या जिल्हा परिषदेला सानिकाचे वडील व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी रेंदाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Sanika Awade_Kolhaur ZP
Nirmala Nawale : सोशल मीडियावर लाखो 'फॉलोअर्स', पण मतपेटीत 'शून्य' करिश्मा? निर्मला नवलेंच्या पराभवाचा संपूर्ण इनसाईड रिपोर्ट!

झेडपी अध्यक्षपदाची दावेदार

सानिका आवाडे ही पहिल्यांदाच राजकारणात त्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रवेश झाला असला तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची दावेदारही ती असू शकते अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. यामागे आवाडे कुटुंबाचा वारसा आणि जनतेनं दणदणीत मतांसह दाखवलेला विश्वास या गोष्टी असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com