Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi Video : राहुल गांधींनी प्रचारात उपस्थित केला महायुतीच्या अडचणीचा मुद्दा, थेट मोदींचे नाव घेत म्हणाले, 'शेतकऱ्यांना त्यांच्या...'

Maharastra Assembly Election Rahul Gandhi : भाजप आणि आरएसएसच्या लोकांना संविधान संपवायचे आहे. मात्र ते उघडपणे बोलू शकत नाहीत. लपून लपून ते बंद खोल्यांमध्ये संविधानाची हत्या करतात, असे राहुल गांधी म्हणाले.

Roshan More

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची चिखलीमधील सभा रद्द करण्यात आली होती. मात्र, गोंदीया येथील त्यांची सभा पार पडली. या सभेत महायुतीची अडचण करणारा शेतकऱ्यांच्या पीकाला भाव मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस, सोयाबीन पिकाला भाव मिळतो का? असा प्रश्न विचारला. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळत नाही, असे देखील राहुल गांधी म्हणाले.

नरेंद्र मोदी सांगतात की त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कायदे आणले होते. जर ते कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर मग शेतकरी रस्त्यावर का उतरले, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. मोदी यांनी उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले पण मागील दहा वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, असे राहूल गांधी म्हणाले.

मोदी अडानी-अंबानीचे...

राहुल गांधी म्हणाले, मोदींनी पोर्ट,एअरपोर्ट अडानीला दिले आहेत. मुंबईतील धारावीची जमीन देखील त्यांना दिली आहे. अंबानीच्या लग्नात नरेंद्र मोदी गेले होते. राहुल गांधी गेला नव्हता. कारण मोदी त्यांचे आहेत आणि मी तुमचा (जनतेचा). मोदींना सगळीकडे खासगीकरण करायचे आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

भाजपला संविधान संपवायचे...

भाजप आणि आरएसएसच्या लोकांना संविधान संपवायचे आहे. मात्र ते उघडपणे बोलू शकत नाहीत. लपून लपून ते बंद खोल्यांमध्ये संविधानाची हत्या करतात. त्यांनी आमदारांना बंद खोल्यांमध्ये पैसे दिले येथील सरकार पाडले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT