Mohammad Adeeb : ' सरकारने मुस्लिमांचे उपकार मानले पाहिजेत, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असता' ; माजी खासदाराचं वक्तव्य!

Mohammad Adeeb Statement at Muslim Conference : मोहम्मद अदीब यांनी दिल्लीत आयोजित मुस्लिम कॉन्फरन्समध्ये हे विधान केलं आहे. यावेळी मंचावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी उपस्थित होते.
Mohammad Adeeb
Mohammad Adeeb
Published on
Updated on

Mohammad Adeeb Statement regarding Pakistan Border : वक्फ संशोधन बिल विरोधात राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यसभेचे माजी खासदार मोहम्मद अदीब देखील सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांनी मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना असं काही म्हटलं की ज्यावरून आता वाद उफाळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मोहम्मद अदीब यांनी दावा केला की, हे मुस्लिमांचे उपकार आहेत की त्यांनी जिन्ना यांना नकार दिला, ज्यामुळे पाकिस्तानची सीमा लाहोरपर्यंतच राहिली, नाहीतर ती लखनऊपर्यंत असती.

मोहम्मद अदीब म्हणाले, जी लोकं पाकिस्तानला गेली आहेत, त्याचा आरोप आमच्यावर केला गेला. परंतु आम्ही तर आमचं रक्त वाटलं होतं. आम्ही तर जिन्नांना नकार दिला होता, फेटाळलं होतं. आम्ही लियाकत अली खानचंही ऐकलं नव्हतं. आम्ही नेहरु, गांधी आणि आझाद यांचं ऐकलं होतं. त्यावेळी जर आम्ही सर्व मुस्लिम जिन्नांसोबत गेलो असतो, हे उपकार तर आमचे सरकारने मानले पाहिजेत. तर मग पाकिस्तान लाहोरपर्यंतच नाहीतर तर लखनऊपर्यंत असता. आम्ही पाकिस्तानला छोटं केलं आणि आम्हालाच तुम्ही शिक्षा देतात.

याशिवाय ते पुढे म्हणाले की, मी आयुष्याची जवळपास ८० वर्षे पूर्ण करत आहे. ५० वर्षांपेक्षा अधिककाळ राजकारणात घालवला आहे. मात्र आज आम्ही आमच्याच भागात एका आरोपीप्रमाणे जगत आहोत. आता तर देशद्रोही देखील झालो आहे, आम्ही अशी अशी लोक बघितली जी आमच्यासोबत होती. नंतर आपले राजकीय कारकिर्द घडवण्यासाठी आम्हाला नशिबावर सोडून निघून गेले. जी लोकं पाकिस्तानला(Pakistan) गेली त्याचा आरोप आमच्यावर केला गेला.

Mohammad Adeeb
S Jaishankar on Pakistan : एस जयशंकर यांनी शहबाज शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला सुनावलं, म्हणाले...

याशिवाय मोहम्मद अदीब यांनी हे देखील म्हटले की, आज आमच्याकडे काहीच उरले नाही. तुम्ही लोकच आमची ताकद आहात. आम्ही सर्वात जास्त जो त्रास सहन केला, तो म्हणजे आता आपली ताकद राहिलेली नाही. आम्ही जेव्हा अलीगढमध्ये शिक्षण घेत होतो, त्यावेळी राजकीय पक्ष म्हणायचे की मियाँ नाराज नको व्हायला.

Mohammad Adeeb
Pakistan News : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला ; 'POK'मधील अत्याचाराचा 'UNHRC'मध्ये झाला 'पर्दाफाश'

मोहम्मद अदीब यांनी दिल्लीत आयोजित मुस्लिम कॉन्फरन्समध्ये हे विधान केलं. त्यांच्या भाषणावेळी मंचावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी आणि जनरल सेक्रेटरी फजलुर्रहीम मुजाद्दिदी देखील उपस्थित होते. याशिवाय काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी, अमरैन महफूज रहमानी, समाजवाजी पार्टीचे नेते आणि रामपूरचे खासदार मौलाना मोहिबुल्लाह नदवी आणि कर्नाटकातील राज्यसभा खासदार सैय्यद नसीर हुसैन देखील हजर होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com