Maharashtra Co Operative Bank Ltd. 
महाराष्ट्र

Co Operative Bank Loan : राज्य सहकारी बँकेची मोठी घोषणा! 25 वर्षांपासून थकलेली कर्जे काढणार निकाली; कर्जदार संस्थांनाही मिळणार दिलासा

Co Operative Bank Loan : तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या थकीत कर्जप्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Co Operative Bank Loan : तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या थकीत कर्जप्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर केली आहे. सुलभ अटी, पारदर्शक प्रक्रिया आणि कालबद्ध अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर आधारित या योजनेमुळे बँकेची अडकलेली मोठी रक्कम वसूल होण्याबरोबरच कर्जदार संस्थांनाही दिलासा मिळणार आहे.

राज्य सहकारी बँक सध्या आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थितीत असून, देशातच नव्हे तर आशियातील अग्रगण्य बँक म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, बँकेकडे सुमारे ४३ संस्थात्मक कर्जप्रकरणे अशी आहेत की, ती २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून थकीत आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल २८८६.७३ कोटी रुपयांची रक्कम अडकून पडली आहे. या कर्जांपैकी अनेक साखर कारखाने आणि औद्योगिक प्रकल्प बँकेच्या ताब्यात असून, त्यांची विक्री किंवा भाडेतत्त्वावर देण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी, या मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी बँकेला दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. त्याचबरोबर अनुत्पादक कर्ज (एनपीए) तरतूद आणि न्यायालयीन प्रकरणांवरील खर्चही वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर बँकेने नव्या योजनेची अंमलबजावणी करताना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कर्जप्रकरणांचा परिणामकारक निपटारा करण्यावर भर दिला आहे. या योजनेमुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल, तसेच संबंधित कर्जदार संस्थांना सन्मानपूर्वक व्यवसाय पुनर्बांधणीची संधी मिळेल, असा विश्वास बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित संस्थांनी बँकेच्या विभागीय कार्यालयांशी किंवा मुंबई येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT