Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Cabinet Formula : भाजपला 20, अजितदादांना 10 मंत्रिपदं, एकनाथ शिंदेंना किती? महायुतीचा फाॅर्म्युला ठरला!

Mahayuti Ajit Pawar Sharad Pawar Eknath Shinde: भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपदअसणार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही याची चर्चा सुरू आहे.

Roshan More

Mahayuti Cabinet Formula : महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत भाजपकडे मुख्यमंत्रिपद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाचा फाॅर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्र्यांना संधी मिळू शकते. तसेच शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद राहणार आहे.

महायुतीचा मंत्रिमंडळातील स्थानाचा 20-12-10 असा फाॅम्युला ठरल्याची माहिती आहे. भाजपला 20 मंत्रीपदं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.

भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद असणार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही याची चर्चा सुरू असताना दिल्लीतून शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, शिंदेंचा निर्णय अजून झाला नाही. त्यामुळे शिवसेनेतील इतर मंत्र्याकडे देखील शिंदे उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतात याची चर्चा आहे.

गृहमंत्रिपदासाठी रस्सीखेच

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील आपला दावा सोडत भाजपला पाठींबा दिला. मात्र, महत्त्वाची खाती आपल्या पक्षाला मिळावी म्हणून शिंदे आग्रही आहेत. मुख्यता गृहमंत्रिपद मिळावे म्हणून शिंदेंचा आग्रह असल्याची माहिती आहे. तर, भाजपने देखील गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवायचे आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावरून देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

अर्थमंत्रिपद अजित पवारांकडेच?

अजित पवार यांना पुन्हा अर्थमंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कॅबिनेटसोबत तीन राज्यमंत्रिपदांचा आग्रह धरला असल्याची माहिती आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे आपल्याच पक्षाकडे ठेवण्यात यशस्वी ठरतील, असे देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT