Pankaja Munde : पंकजा मुंडे, राम शिंदे यांना मंत्रिपद नाही? भाजपचा 'तो' अलिखित नियम येणार आड

Pankaja Munde Ram Shinde Cabinet BJP : मंत्रिपदासाठी विधान परिषदेमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रवीण दरेकर हे मंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात.
Pankaja Munde Ram Shinde
Pankaja Munde Ram Shindesarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ग्रँड विजय मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला येणार आहेत. मात्र, विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. भाजपच्या वरिष्ठांनी विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांना मंत्रिपद मिळणार असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. त्यामुळे या वेळी देखील विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा अलिखित नियम पंकजा मुंडे, राम शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या आड येण्याची शक्यता आहे. राम शिंदे हे विधान परिषदेत आमदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ते रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले.

Pankaja Munde Ram Shinde
Eknath Shinde : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? शिंदेंच्या आमदाराने दिले मोठे संकेत...

पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. 2019 ला विधानसभेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. यंदा लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेत त्यांचे पुनर्वसन केले. भाजपला मिळालेल्या यशामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

20-12-10 मंत्रिमंडळा फाॅर्म्युला

मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युला हा 20-12-10 असा राहणार असल्याची चर्चा आहे. सर्वाधिक 20 मंत्रीपदं भाजपकडे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 12 तर अजित पवार यांच्या पक्षाला 9 ते 10 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील आमदरांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार का? याची चर्चा आहे.

...तर परळीत दोन मंत्री?

पंकजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले आहे. 2019 ला त्यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या. परळीतून पुन्हा धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाले तर परळीला दोन मंत्री मिळतील.

Pankaja Munde Ram Shinde
Gautam Adani Bribery Case : अदानी प्रकरण संसदेत काँग्रेसच्या अंगलट; मित्रपक्षांनी सोडली साथ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com