Mumbai News: महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला मोठ्या प्रमाणात वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहे. यामुळे राज्याचं प्रशासन हादरलं आहे.
राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मंगळवारी (ता.19 मे) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचाही समावेश आहे. त्यांच्यासह एकूण सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या आहेत.
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत.मंगळवारी रात्री या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात 4 प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह कॅबिनेटमधील मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीनंतर काही तासांतच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश येऊन धडकले आहेत.
राज्य सरकारकडून बदल्या करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे,संजय खंदारे,कान्हुराज बगाटे,बाबासाहेब बेलदार,श्रीधर डुबे,आर एस चव्हाण यांचा समावेश आहे. तुकाराम मुंढेंची ही 21 वर्षांतील 25 वी बदली आहे.
1) तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर डुबे (भाप्रसे) यांच्या जागी राज्य सरकारकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
2) कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.श्रीमती.रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
3) संजय खंदारे यांची मंत्रालय येथे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन या विषयाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे.त्यांना धीरज कुमार यांच्याकडून कार्यभार स्वीकारण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आले आहेत.
4) बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
5) श्रीधर डुबे यांची मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली आहे.
6) आर एस चव्हाण यांची हापकीन जीव औषध निर्माण महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.