Tukaram Mundhe News: IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली: आता मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्याची जबाबदारी

IAS Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या 25 वेळा बदल्या झाल्या आहेत.पण आता आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे.
Tukaram Mundhe, Devendra Fadnavis
Tukaram Mundhe, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. मंगळवारी (ता.19 मे) सायंकाळी सरकारने पुन्हा काही वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात धडाडीचे आयएएसस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या 25 वेळा बदल्या झाल्या आहेत.

फडणवीस सरकारकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्याशी संबधित ही बदली असणार आहे. त्यामुळे मुंढे हे झिरवाळांशी कसं जुळवून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्य सरकारने तुकाराम मुंढेंची 31 मार्च रोजी दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली केली होती. पण आईचं निधन झाल्यानं ते पदाचा चार्ज घेऊ शकले नव्हते. त्यानंतर सनदी अधिकारी विनिता वैद सिंघल यांची याच पदावरची बदली केली. अवघ्या 10 दिवसांत बदली रद्द केल्यामुळे मुंढेंची पुन्हा एकदा बदली होणार हे स्पष्ट होते.

Tukaram Mundhe, Devendra Fadnavis
Medha Kulkarni: खासदार मेधा कुलकर्णींना केंद्रात मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या 'समिती'च्या अध्यक्षपदी वर्णी

सिंघल यांची पाच महिन्यांपूर्वीच आपत्ती व्यवस्थापनात बदली करण्यात आली होती. पण लगेचच बदली केल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्याच दरम्यान, मंत्री पातळीवर वेगवान घडामोडी घडल्या आणि सिंघल यांची बदली रद्द झाली. त्यांच्याकडे जुनाच कार्यभार कायम ठेवण्यात आला. त्यांना पुन्हा त्याच विभागात कायम ठेवल्याने तुकाराम मुंढे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com