CM Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : भाजपकडून शपथविधीची तारीख जाहीर, एकनाथ शिंदेंना विश्वासात घेतले नाही?

Mahayuti Government swearing ceremony Eknath Shinde sanjay sirsat : मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला असावा. नाव देखील घोषित करायला हरकत नव्हती. मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली पाहिजे होती, असे संजय शिरसाट म्हणाले.

Roshan More

Shivsena News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटरवरून पाच डिसेंबरला महायुतीचा शपथविधी होणार असल्याचा जाहीरे केले. पण, या शपथविधीची विषयी शिवसेनेच्या ट्विटरवरून अथवा एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडियावरून काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेताच शपथविधीची तारीख जाहीर केली का? याच्या चर्चा सुरू आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, बावनकुळे यांना वरिष्ठ नेते अमित शाह, जे पी नड्डासाहेब यांनी माहिती दिली असावी. त्याप्रमाणे त्यांनी शपथविधीची तारखी जाहीर केली असेल. आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब हे गावी आहेत त्यांच्याशी याविषयी संवाद साधला असावा. त्यांच्याशी संपर्क झाला आसावा किंवा त्यांना त्याविषयी माहिती असावी. मात्र, याविषयी आम्हाला माहिती नाही. शिंदे साहेबांसोबत चर्चा करूनच शपथविधीच्या तारखेचा निर्णय घेतला असावा.

शपथविधीची तारीख जाहीर झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला असावा. नाव देखील घोषित करायला हरकत नव्हती. मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली पाहिजे होती. शपथविधीची तारीख जाहीर झाल्याने जनता वाट पाहत होती त्याची प्रतिक्षा संपली. असे समजायला हरकत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

नड्डा-तावडेंमध्ये दीड तास चर्चा

राज्यात महायुतीच्या सरकारच्या शपथ समारंभाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस विनोद तावडे यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या बैठकीनंतर तावडे मीडियाशी काही न बोलता निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT