Ladki Bahin scheme Aditi Tatkare And Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Aditi Tatkare : 'लाडक्या बहिणींना पगारी मतदार' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आदिती तटकरे यांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, 'टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील'

Aditi Tatkare On Uddhav Thackeray remark over Ladki Bahin scheme : राज्यात दसऱ्याच्या निमित्ताने पाच एक दसरा मेळावे पार पडले. यातील दोन तर शिवसेनेचे होते. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. ज्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

  1. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर ‘पगारी मतदार’ तयार करण्याचा आरोप केला होता.

  2. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार करत ही योजना महिलांसाठी आनंददायी असल्याचे म्हटले.

  3. त्यांनी स्पष्ट केलं की, लाडक्या बहिणींच्या आनंदाचं समाधान आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, राजकारणासाठी नव्हे.

Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील जोरदार घणाघात केला होता. ठाकरे यांनी लाडकी बहीण सारख्या योजनांमधून सरकार पगारी मतदार तयार करत असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील त्यांच्यावर निशाना साधला आहे.

ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेवरून वाद सुरू झाला असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते महायुतीच्या सरकारने केलं आहे.

त्याचे नकारात्मक पडसाद लाडकी बहीण योजना सुरू केल्या पासूनच पहायला मिळाले. परंतु कुठल्याही टीकेकडे लक्ष न देता ही योजना पुढे सुरू ठेवणार आहोत. लाडक्या बहिणींच्या या योजनेमुळे आलेला आनंद आमच्यासाठी महत्वाचा असल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याना E-KYC त येणाऱ्या अडचणीवरून देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याना E-KYC करताना येणाऱ्या अडचणींवर गंभीर दखल घेतल्याचे म्हटलं आहे.

आदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी, E-KYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन दिल आहे. 'e-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार असंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.

FAQs :

प्र.१: उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर काय वक्तव्य केले?
उ: त्यांनी या योजनेतून सरकार पगारी मतदार तयार करत असल्याचा आरोप केला.

प्र.२: आदिती तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना काय उत्तर दिलं?
उ: त्यांनी म्हटलं की, “लाडक्या बहिणींच्या आनंदाचं समाधान आमच्यासाठी महत्वाचं आहे.”

प्र.३: लाडकी बहीण योजना कोणाच्या नेतृत्वाखाली चालते?
उ: ही योजना महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागांतर्गत चालते.

प्र.४: उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे कोणता वाद निर्माण झाला?
उ: ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या योजनांवरून राजकीय वाद पेटला आहे.

प्र.५: आदिती तटकरे कोणत्या पक्षाच्या आहेत?
उ: त्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री असून शिंदे सरकारचा भाग आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT