Ajit Pawar Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Eknath Shinde : मध्यरात्री अमित शहांशी चर्चा, 39 जागांसाठी अजित पवार, एकनाथ शिंदे भिडणार?

Amit shah Ajit Pawar Eknath Shinde : भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढण्याचे निश्चित केल्याने अजित पवारांच्या वाट्याला अधिक जागा येणार नाही. त्यांना महायुतीमधून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण केली जाईल, अशी चर्चा होती.

Roshan More

Mahayuti Politics : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. बुधवारी (ता.25) मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागा वाटपाची चर्चा केली. या चर्चेत भाजप 150 पेक्षा अधिक जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ज्याचे विद्यमान आमदार त्या जागा त्या पक्षाकडे, या सुत्रानुसार अजित पवार यांच्याकडे तीन काँग्रेस आमदारांसह 44 आमदार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्याकडे अपक्ष आमदारांचा पाठींबा धरता 50 आमदार आहेत.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मिळून 94 आमदार आहेत. त्यामुळे उरलेल्या 39 जागांपैकी जास्तीत जास्त मिळवण्यासाठी अजित पवार एकनाथ शिंदेंमध्ये चुरस होणार आहे.

महायुतीची सत्ता परत आली तर सत्तेत वाटा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकणे महायुतीमधील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे 39 जागांपैकी जास्तीत जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवार महायुतीसोबतच

भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढण्याचे निश्चित केल्याने अजित पवारांच्या वाट्याला अधिक जागा येणार नाही. त्यांना महायुतीमधून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्रा दौऱ्यात अजित पवार हे महायुतीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अजितदादांसमोर स्टाईक रेटचे आव्हान

अजित पवार यांना महायुतीमध्ये जागा वाटपात सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे कमी जागा घेऊन चांगल्या स्ट्राईक रेटने जास्तीत जास्त जागा जिंकणे हे आव्हान अजित पवार यांच्या समोर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT