Raj Thackeray : 'मी पुन्हा राजकारणात येण्यासाठी पण 'तोच' कारणीभूत आहे' ; राज ठाकरेंचं वक्तव्य!

Raj Thackeray Politics : जाणून घ्या, राज ठाकरे यांनी नेमकं कोणाबाबत म्हटलं आहे आणि आणखी काय सांगितलं आहे?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray on Sajid Nadiadwala : '२००० साली मी एका पक्षात होतो ... ज्या काही गोष्टी सुरू होत्या.. त्या पाहून मी रिव्हर्स गियर टाकला होता.. मला राजकारण नको वैगरे ठरवल्यावर साजिद नाडियादवाला आणि मी प्रोडक्शन हाउस बनवायचं ठरला. पण पुन्हा राजकारणात येण्यासाठी पण तोच कारणीभूत आहे.' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याशिवाय 'तो म्हणाला, राज साहेब मी प्रोड्यूसर आहे, काय काय करावं लागतं मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच राहा.' असंही राज ठाकरेंनी सांगितलं. 'येक नंबर' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

Raj Thackeray
Vidarbha News : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सचिवांचा मोठा खुलासा; म्हणाले, '2014 मध्ये बावनकुळेंना...'

यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, केदार शिंदे याने येक नंबर ही टाइटल दिले. अजय-अतुलला " त " हा शब्द म्हटल्यावर ताक पण कळतं आणि ताडी पण कळते. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईन वर प्रत्येकाने झोकून दिलं. आणि उत्तम कलाकृती सादर झाली.'

Raj Thackeray
Bhanudas Murkute on Vikhe : 'विखेंना निवडणुकीत पराभव दिसू लागला त्यामुळे त्यांनी..' ; मुरकुटेंचा हल्लाबोल!

राज ठाकरेंनी पुढे सांगितले की, आज एवढ्या वर्षांनी प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. तेजस्विनी पंडित भेटल्या, रिजनल फिल्म मोठ्या व्हायला हव्यात, आम्हाला पण वाटतय. उत्तम चित्रपट मराठीत बनत आहेत. परंतु ज्याप्रकारे इतर रिजनल फिल्म मोठ्या होताना दिसत आहेत, त्याप्रमाणे मराठी बनवणं सुद्धा गरजेचं आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com