Mahayuti Politics : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप लवकर करण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. लोकसभेला जागा वाटपला उशीर झाल्याने फटका बसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजप 160 जागांवर आग्रही असून अमित शाहांनी जागा वाटपाचा फाॅम्युला निश्चित केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला केवळ 70 जागा मिळणार आहेत. या विषयीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.
अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जागा वाटपावर चर्चा केल्याची माहिती आहे.
अमित शाह यांच्या फाॅम्युल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 70 जागा येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची बोळवळ केवळ 40 जागांवर केली जाणार असल्याचे 'साम टिव्ही'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे मित्रपक्षांनी जास्त जागांचा आग्रह धरू नये, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील स्ट्राईक रेटनुसार जागा वाटप होईल. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून त्यांच्या वाट्याला 120 जागा येतील, असा दावा करण्यात येत होता. मात्र, शिवसेनाला केवळ 70 जागा मिळणार असल्याच्या चर्चांनी शिवसेना नेते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये अमित शाह यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा देण्याचा फाॅर्म्युला ठेवला आहे. मात्र, काँग्रेसमधील काही आमदार राष्ट्रवादी येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 60 ते 65 जागांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाला उशीर होत असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.