Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Seat Shairing News : महायुतीचे ठरेना; एकनाथ शिंदे, अजित पवारांना सतावतेय 'ही' भीती !

Political News : महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरु आहे. महायुती व मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

Sachin Waghmare

Bjp News : येत्या काळात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरु आहे. महायुती व मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

महायुतीची गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिग्ग्ज मंडळीची हजेरी होती. मात्र, या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युलावर एकमत झाले नाही, त्यामुळे पुन्हा बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीला हजेरी लावली. या सर्व नेतेमंडळीच्या दिल्ली दौऱ्यानंतरही सत्ताधारी महायुतीचे जागावाटप रखडलेले आहे. जागावाटप रखडले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेगळीच भीती सतावत आहे.

जागावाटपात शिंदे व पवार गटाला कमी जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे गटातील विद्यमान खासदार आणि इच्छूक नेत्यांना उमेदवारी नाकारली जाणार आहे. त्यामुळे ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अजित पवार गटातही अशीच स्थिती आहे.

तिकीट नाकारल्यास इच्छूक आणि विद्यमान खासदार पुन्हा शरद पवार गटाकडे जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे याच गोष्टीची भीती दोन्ही गटांना सतावत आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या बैठकीत भाजपकडून काय निर्णय घेतला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार भाजपने आपल्या ३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली असली आणखी एक जागा कमी करीत ३४ जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या घटक पक्षात एकमत झाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं (Shivsena) लढवलेल्या जागाही देण्यास नकार दर्शविला आहे तर दुसरीकडे तीन ते चार खासदारांची कामगिरी निष्क्रिय असल्याचे सांगत या जागा भाजपने (Bjp) लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपने नव्याने दिलेला फॉर्म्युला एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) मान्य करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीची दिल्लीत जागावाटपाबाबत ११ किंवा १२ मार्चला जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे.

SCROLL FOR NEXT