Hingoli Loksabha News: हेमंत पाटलांच्या मदतीला जनशताब्दी धावली; दुसऱ्यांदा दिल्लीसाठी धक्का मिळणार का?

Loksabha Election 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत.
Hingoli Loksabha Constituency News
Hingoli Loksabha Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासनाकडून अनेक निर्णय घेतले जातात. रेल्वे प्रशासनाकडून मराठवाड्यातील प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधेबाबत नेहमीच ओरड होत असते. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी जनतेमधून होत असते. मात्र, प्रवाशांच्या पदरी नेहमीच निराशा पडते. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली पर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय हेमंत पाटलांच्या किती उपयोगी पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. महायुतीच्या जागावाटपात हिंगोली मतदारसंघ शिवसेनेकडे असेल, असा विश्वास त्यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागामध्ये मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचा समावेश आहे. मात्र गाड्यांची संख्या व रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच दुजाभाव करण्यात येतो.

Hingoli Loksabha Constituency News
Madha Politics : माढ्याचं मैदान मारण्यासाठी जानकरांना मिळणार का विजयसिंह मोहिते-पाटलांची साथ ?

जालना ते मुंबई या जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी अनेकदा केलेली आहे. मात्र त्या संदर्भात निर्णय झालेला नव्हता. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार असल्याने शासनाकडून निर्णयांचा धडाका सुरू आहे. आचारसंहितेच्या धसक्याने विविध विकासकामांचे उद्घाटन केले जात आहे. अशाच पद्धतीने जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचे हिंगोलीपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय झाला.

या निर्णयामुळे परभणी- हिंगोली- नांदेड या तीन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असण्याची शक्यता आहे. तसेच विद्यमान खासदार हेमंत पाटील हे दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे हे भाजपचे आहेत, कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे शिवसेनेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहेत. या लोकप्रतिनिधीमुळे महायुतीची स्थिती भक्कम आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता याचाही मोठा फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी धक्का देणारा ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Hingoli Loksabha Constituency News
Kolhapur News : संजय मंडलिक यांनाच उमेदवारी द्या; 'या' आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com