Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीने विधानसभेसाठी टाकले पुढचे पाऊल; समन्वय समितीचा प्लॅन ठरला

Political News : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती तयार केली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने महायुतीने आतापासूनच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती तयार केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे समितीचे अध्यक्ष आहेत.

या समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षाने पुढचे पाऊल टाकले आहे. या बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी पुढची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. यामध्ये महायुतीची स्टॅटर्जी ठरणार आहे. (Mahayuti News)

मंगळवारी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढेल, असे ठरले. त्यासोबतच विविध विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तीनही पक्षाचे सदस्य उपस्थित होते. उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. त्त्यामध्ये विस्तृतपणे चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला महायुतीमधील आमदार प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, सचिन जोशी, उदय सामंत, योगेश टिळेकर, अजित गोपछडे, संजय खोडके हे नेते उपस्थित होते.

प्रमुख नेत्याची होणार उद्या बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बुधवारी सयुंक्तपणे वर्षा या निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक होणार आहे. समन्वय समितीच्या या बैठकीनंतर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्राचारयंत्रणा, सभा, दौरे या संदर्भात चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT