Ajit Pawar News : अजित पवार गटाच्या 'या' दहा आमदारांचे तिकीट 'कन्फर्म'; बाकी मंडळी 'वेटिंग'वर

Ncp Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात या आमदारांचा अहवाल सकारात्मक आला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. या पक्षाने उतरवलेल्या चार उमेदवारांपैकी केवळ एकच खासदार निवडून आला, तर पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासोबतच येत्या काळात पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवीन कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात या सर्व आमदारांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे (Ncp) सध्या 41 आमदार असून, त्यातील जवळपास 25 टक्के आमदार म्हणजेच दहा आमदार 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यामुळे या दहा आमदारांना पुन्हा तिकीट मिळाले, तर त्यांची निवडून येण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. त्यामुळेच त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट दिले जाण्याची दाट शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

त्यासोबतच आगामी काळात मराठा-ओबीसी वादाचे प्रभावक्षेत्र असलेल्या; तसेच या विषयावर भूमिका मांडणाऱ्या आमदारांबाबत मात्र सध्या सावधगिरी बाळगण्यात येत आहे. सध्या राष्ट्रवादीत 41 आमदार असून, त्यापैकी जवळपास 25 टक्के आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यानंतर उर्वरित 31 आमदारांच्या उमेदवारीबाबत सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ajit Pawar
MP Sandipan Bhumre : खासदार भुमरेंनी संसदेत पहिले भाषण वाचून केले, तरी टाळ्या मिळवल्या..

ज्या आमदाराबाबत नाराजी आहे अथवा जनतेचा रोष आहे. त्याशिवाय त्याठिकाणी त्यांच्या तुलनेत तगडा उमेदवार आहे, या बाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाणार असल्याचे समजते.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व 288 जागांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यानुसार येत्या काळात पक्षाचे उमेदवार ठरवत असताना या सर्वेक्षणातील मुद्दे महत्वाचे ठरणार असल्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या काळात पक्षाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar Politics : शरद पवारांची मोठी खेळी; राजेंद्र शिंगणेंना घरातूनच आव्हान देण्याची तयारी; पुतणी उतरणार मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com