Court Sarkarnama
महाराष्ट्र

BJP MLA News : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; भाजप आमदाराला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमके प्रकरण..?

BJP MLA: वादातून संबंधित तरुणाला गंभीर दुखापत व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी तब्बल 16 वर्षानंतर या खटल्यात न्यायालयाने निकाल दिला.

Sachin Waghmare

Mumabi News : उरण परिसरातील एका मुलीची २०१० साली छेड काढण्यात आली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी भाजपचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्यासह त्यांचे चार सहकारी संबंधित युवकाकडे जाब विचारण्यासाठी गेले होते. वादातून संबंधित तरुणाला गंभीर दुखापत व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी तब्बल 16 वर्षानंतर या खटल्यात न्यायालयाने निकाल दिला असून आमदार महेश बालादी यांच्यासह चारही जणांना दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उरण परिसरातील एका मुलीची 2010 साली छेडछाड झाली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) आणि त्यांचे काही सहकारी संबंधित तरुणाकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून संबंधित तरुणाला गंभीर दुखापत व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अलिबाग न्यायालयात खटला सुरू होता.

याप्रकरणी गुरुवारी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी या खटल्यावर अंतिम निकाल सुनावत आमदार महेश बालदी यांच्यासह चारही आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर या चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, जिल्हा न्यायालयात या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

बालदी यांची आमदारकी धोक्यात ?

याप्रकरणी जिल्हा कोर्टात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी गुरुवारी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी निर्णय देत बालदी यांना तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला. त्यामुळे भाजपचे (BJP) आमदार बालदी यांची आमदारकी देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य 4 जणांना देखील शिक्षा सुनावण्यात आलीय. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT