Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde News: एकीकडे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात,तिकडे धनंजय मुंडेंनी गाठली दिल्ली; शहांसोबत सुमारे एक तास चर्चा, मंत्रिमंडळात 'कमबॅक' ?

Dhananjay Munde Amit Shah Meeting: राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याचदरम्यान,माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'च्या चर्चांना उधाण आलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक सत्र न्यायालयानं गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात मंत्री कोकाटे धक्का देत त्यांची शिक्षा कायम ठेवत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.एकीकडे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी (Manikrao Kokate) जामिनासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती,मात्र न्यायाधीशांनी कोकाटेंची बाजू ऐकून घेण्यास नकार दिला आहे.

याप्रकरणी आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.त्यामुळे कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार असताना त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याचदरम्यान,माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'च्या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बुधवारी(ता.17) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.शाह आणि मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास झाली.एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आले असतानाच मुंडे आणि शाह यांच्यातील ही भेट निश्चित मोठी राजकीय घडामोड असल्याचं मानलं जात आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि खून प्रकरणात काही गंभीर आरोपांचे शिंतोडे धनंजय मुंडे यांच्याही अंगावर पडले होते.मुंडेंचा राईट हँड अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराड हाच या प्रकरणातला मुख्य आरोपी निघाल्यानं सहाजिकच त्याला पाठीशी घातल्याचा आरोप मुंडेंवर विरोधकांनी केला.

त्यातच कृषिमंत्री पदाच्या काळातील यंत्र-औषधी खरेदी प्रकरणातील घोटाळ्याचा आरोप,कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने दिलेला दणका,जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील गैरव्यवहाराच्या आरोप अशा एक ना अनेक आरोपांनी धनंजय मुंडे पुरते अडकले. त्यात त्यांना त्यांचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदही गमवावं लागलं. त्यांच्या जागी नाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाली.

पण कृषिखात्यातील आरोपांवर निर्दोष मुक्तता झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी सूचक संकेत दिले होते.कृषी विभागाशी संबंधित आरोपांमधून न्यायालयाने मुंडे यांना क्लीनचिट दिल्यानंतर,आता आणखी एका प्रकरणात निर्दोष ठरवलं तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल,असे संकेत अजित पवार यांनी म्हटलं होतं.पण त्यानंतर विरोधकांनी अजितदादा आणि मुंडेंवर टीकेची झोड उठवली होती.

यानंतर धनंजय मुंडेंनी एका कार्यक्रमात राजकारणात आपल्याला सुनील तटकरे यांचा कायम आधार राहिला आहे, त्यांचे आणि माझे संबंध सगळ्यांना माहित असून आता रिकामं ठेवू नका,काहीतरी जबाबदारी द्या, असं म्हटलं होतं. त्यांच्या विधानातून मला मिळाली तेवढी शिक्षा पुरे झाली,आता तुम्हीच अजितदादांना सांगा अन् मंत्रिपद द्या,असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ काढण्यात आला होता. यावरूनही मोठा गदारोळ झाला होता.

पण आता क्रिडामंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार का अशी चर्चा अमित शाह यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.या भेटीनंतर मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधणं टाळल्यामुळे शाहांसोबत नेमकं काय़ चर्चा झाली हे समोर आलं नव्हतं. यापूर्वी राजीनामा दिल्यानंतर मुंडे यांनी अमित शहांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी ते शक्य झाले नव्हते.त्यामुळे आजची शहांची भेट महाराष्ट्रातील नव्या संभाव्य घडामोडींची नांदी तर ठरणार नाही ना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धनंजय मुंडेंची पोस्ट चर्चेत...

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री.अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT