Maharashtra cabinet reshuffle Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंच्या जागी माजी मंत्र्यांऐवजी मराठा समाजातील नव्या चेहऱ्याला संधी? तीन नावांची चर्चा

Maharashtra Cabinet NCP politics: कोकाटेंकडील मंत्रिपद अन्य सहकाऱ्यांना देताना अजित पवारांकडून जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे हे या खात्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.

Mangesh Mahale

सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कोकाटे यांच्याजागी कुणाला मंत्रिपद मिळेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

अजित पवार हे माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा सुरु असताना काही नावे समोर येत आहे.

सध्या नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु असल्यामुळे कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे अजित पवार यांनी स्वत:कडे ठेवले आहे.

कोकाटेंकडील मंत्रिपद अन्य सहकाऱ्यांना देताना अजित पवारांकडून जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे हे या खात्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.

अजित पवार माजी मंत्र्यांकडे हे खाते देणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार याबाबत काही नावे समोर येत आहे. कोकाटेच्या जागी मराठा समाजातील नेत्याकडे हे खाते जाईल, अशी शक्यता वाटत आहे. असे झाले तर संग्राम जगताप, सुनील शेळके, प्रकाश सोळंखे ही तीन नावे समोर येत आहे. दुसरीकडे कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक ही जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत

अजित पवार यांनी हे खाते सध्या आपल्याकडे ठेवले असले तरी आचारसंहिता संपल्यानंतर नव्या किंवा प्रतीक्षेत असलेल्या आमदाराला ते संधी देणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. राष्ट्रवादीत अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत आणि दुसरे म्हणजे लोकसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्याची गरज आहे.

फडणवीसांची मोठी कसोटी ठरणार

महायुती सरकारमध्ये आधीच खातेवाटपावरून नाराजीचे सूर उमटत असताना, कोकाटे यांच्या खात्याचे पुनर्वाटप हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी समन्वयाची मोठी कसोटी ठरणार आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी यांच्यातील संतुलन बिघडू नये, याची विशेष काळजी फडणवीस घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT