Chhagan Bhujbal sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : आज होणार होती छगन भुजबळ यांची दुसरी परीक्षा, मात्र मिळाला दिलासा!

Mackpole in yeola Chhagan Bhujbal constituency : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांनी येवल्यात मॉकपोलची मागणी केली होती. मात्र आज होणारे मॉकपोल रद्द करण्यात आले.

Aslam Shanedivan

Chhagan Bhujbal News : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पराभूत उमेदवारांनी असहमती व्यक्त केली होती. यासंदर्भात राज्यातील 21 मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणुकीला आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज येवला मतदार संघात मॉकपोल होणार होते. मात्र ती रद्द करण्यात आल्याने छगन भुजबळ यांची दुसरी परीक्षा तुर्तास तरी टळली आहे. त्या सध्यातरी मिळाला दिलासा मिळाला आहे.

नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम यंत्रांवर अविश्वास व्यक्त केला होता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत विविध आक्षेप नोंदविले होते. यासंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात देखील असेच वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मॉकपोल घेण्याची मागणी केली होती. त्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती.

यासंदर्भात आज मतदारसंघातील चौदाशे मतदारांचे मॉकपोल घेण्यात येणार होते. त्याची जोरदार तयारी प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केली होती. आज मतदार संघातील चौदाशे जणांचे चाचणी मतदान घेण्यात येणार होते.

संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याची केबल सुनावणी सुरू आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान यंत्रातील डेटा सुरक्षित ठेवावा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात 14 फेब्रुवारीला सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती कळविण्यात आली होती. त्यानुसार आज होणारे मॉकपोल रद्द करण्यात आले.

येवला मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील फॅक्टर चांगल्याच सक्रिय होता. त्याचा फटका माजी मंत्री छगन भुजबळ यांना देखील बसला होता. त्यांचे मताधिक्य लक्षणीय घटले. माजी मंत्री भुजबळ यांनी देखील त्याची कबुली दिली होती. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मॉक पोल विषयी भुजबळ समर्थक आणि विरोधक दोघांनाही मोठी उत्सुकता होती. मात्र ऐनवेळी त्याला स्थगिती मिळाल्याने सगळ्यांचीच निराशा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT