"Manoj Jarange seen confronting protesters during his visit to support Bachchu Kadu." Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : बच्चू कडूंना ताकद देण्यासाठी गेलेले मनोज जरांगे आंदोलकांवरच भडकले; डाव, प्रतिडाव... बरंच बोलले

Manoj Jarange’s Visit to Support Bachchu Kadu : आपल्याला आंदोलन चालवायचे आहे. कुठल्याही आंदोलनाचा मुळ गाभा हा आंदोलक असतो, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले.

Rajanand More

Bachchu Kadu protest update : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गुरूवारी सकाळी मनोज जरांगे पाटील दाखल झाले. त्यांनी माजी आमदार बच्चू कडू व इतर शेतकरी नेत्यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर या सर्वांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी जरांगे पाटील आंदोलकांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधल्यानंतर मनोज जरांगेंनी बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही आंदोलकांचा त्याठिकाणी गोंधळ सुरू असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे जरांगेंचा पारा चढला. त्यांनी थेट या आंदोलकांकडून तिथून बाहेर काढण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांना आंदोलन यशस्वी होण्यासाठी कसे वागावे, याचे धडेही दिले.

जरांगे पाटील म्हणाले, मी इथं शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो आहे. मी कधीही माझी बाजू लपवून ठेवत नाही. आपल्याला आंदोलन चालवायचे आहे. कुठल्याही आंदोलनाचा मुळ गाभा हा आंदोलक असतो. आता टप्पा कसा असला पाहिजे, कोणती भूमिका घेतली पाहिजे, त्यासाठी नेतृत्वाची भूमिका समजून घेतली पाहिजे. आम्ही मुंबईत लाखोने गेलो होतो. सगळे शांतपणे ऐकून घेत होते.

केवळ नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. पण अशा गोष्टींमुळे त्याची तळमळ, कष्ट वाया जाते. त्यामुळे त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. इथून पुढच्या काळात शांतता ठेवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारे विधान केले आणि आपण इथे का आलो, याचे कारण सांगितले.

मी काल साडे सहा वाजता पाहिले, डाव टाकलेला. ते पाहून आपण घरात बसू शकत नाही, असे वाटले आणि फोन केला आणि इथं येणार असल्याचे सांगितले. सरकारचे षडयंत्र, डाव प्रतिडावानेच मोडावा लागेल, तरच आपण यशस्वी होऊ, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

आम्हाला तुमचे मुंबईचं ठरलेलं माहिती नाही आणि त्यात मी पडणारही नाही. या आंदोलनाचे ज्ञान तुम्हाला जास्त आहे. शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडता कामा नयेत, असे सांगत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच बच्चू कडू मुंबईकडे रवाना झाले. आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंदोलनातील मागण्यांबाबत बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT