Election Commission : महाराष्ट्रासाठी निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; अधिकाऱ्यांना आदेश, 'त्या' मतदारांकडून भरून घेतले जाणार हमीपत्र

दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्यानंतर त्या मतदाराकडून हमीपत्र भरून घेतले जाईल.
“Election Commission officials verifying Maharashtra local body voter lists to identify and remove duplicate names.”
“Election Commission officials verifying Maharashtra local body voter lists to identify and remove duplicate names.”Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार.

  2. विरोधकांकडून मतदारयादीतील त्रुटींवर आक्षेप - 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन.

  3. त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - दुबार मतदारांची तपासणी आणि हमीपत्र प्रक्रिया अनिवार्य.

Affidavit Requirement for Duplicate Voters : राज्यात पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. पण त्याआधी विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाला केले आहे. त्यासाठी विरोधकांनी 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाचे आयोजनही केले आहे. पण त्याआधीच आयोगाने मतदारयादीतील दुबार नावांबाबत महत्वाचे आदेश दिले आहे.

विधानसभा मतदारसंघाची मतदार यादीच स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. ही मतदारयादी केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहाय, तर जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजीत केली जाते.

मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार आहे. मात्र, दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. दुबार मतदारांबाबत तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत तपासणी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र याची प्राथमिक तपासणीनंतर त्यांत साम्य आढळून आल्यास मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद निवडणूक विभागातील किंवा पंचायत समितीच्या गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत अर्ज घेतला जाणार आहे. अशा मतदारांना इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.

“Election Commission officials verifying Maharashtra local body voter lists to identify and remove duplicate names.”
Government Residence Expenses : होऊ द्या खर्च! तुकाराम मुंढेंनंतर आता नार्वेकर, राम शिंदे अन् भरणेंच्या बंगल्यांचा थाट

दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्यानंतर त्या मतदाराकडून हमीपत्र भरून घेतले जाईल. त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहे.

अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा दिली जाणार आहे. या मतदारांकडून हमीपत्र भरून घेतले जाणार असल्याने मतदानानंतर दुबार मतदान केल्याचे आढळून आल्यास संबंधित मतदारांवर नंतर कारवाईही होऊ शकते.  

“Election Commission officials verifying Maharashtra local body voter lists to identify and remove duplicate names.”
Bacchu Kadu : 'त्या' शेतकऱ्यांची कर्जमाफी नको, सरकारसोबत चर्चेला जाण्याआधी बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय म्हणाले?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: दुबार मतदार कसे ओळखले जातील?
A: नाव, पत्ता, लिंग आणि छायाचित्र यांची तुलना करून ओळख पटवली जाईल.

Q2: मतदारयादीत (**) चिन्ह म्हणजे काय?
A: त्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्याचे दर्शविणारे चिन्ह आहे.

Q3: हमीपत्र का घ्यावे लागेल?
A: मतदाराने दुसऱ्या केंद्रावर मतदान केलेले नाही, याची खात्री करण्यासाठी.

Q4: दुबार मतदान आढळल्यास काय होईल?
A: अशा मतदारांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com