Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Dasara Melava : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांआधी मनोज जरांगेंनी ठोकला शड्डू; महायुतीचं टेन्शन वाढलं...

Manoj Jarange Leads Farmers’ Fight at Dasara Melava : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमुक्ती, हमीभाव, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

Rajanand More

Key 8 Demands Placed Before the Government : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणगडावरील दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी आठ मागण्या करत राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला. आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे संकेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाल्याचे सांगत दसरा मेळाव्यातून आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी केली.

जरांगे पाटील यांनी एकूण आठ मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमुक्ती, हमीभाव, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आदी प्रमुख मागण्यांचाही समावेश आहे. याबाबत दिवाळी संपायच्या आत घोषणा करण्याचे अल्टिमेटम जरांगे यांनी सरकारला दिले.

सरकारने मागण्या मागण्या केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळीनंतर एक बैठक घेऊन आंदोलनाला सुरूवात केली जाईल, अशी घोषणा जरांगे यांनी केली. आगामी झेडपी, नगरपालिका, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याबाबतचे सूचक संकेत त्यांनी दिले. गावात मतदान घेऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. सरकारला म्हणजे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला धडा शिकविण्याची भाषा जरांगेंनी केली आहे.

मनोज जरांगेंनी केलेल्या आठ मागण्या -

  1. ओला दुष्काळ जाहीर करा.

  2. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ७० हजार रुपये भरपाई, शेतजमीन, पीक वाहून गेलं असेल तर त्यांना १ लाख ३० हजार भरपाई, जनावरं वाहून केली, पीकं वाहून गेली, त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून १०० टक्के भरपाई.

  3. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रुपयाही कापायचा नाही. सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पगार कापा. राजकीय नेते, उद्योगपतींकडून पैसे घ्या.

  4. संपूर्ण कर्जमुक्ती.

  5. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी.

  6. शेतमालाला हमीभाव.

  7. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा. (उदा. दहा एकराच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांना महिना दहा हजार रुपये द्यावेत)

  8. पीकविम्यावरील ट्रिगर उठवावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT