Dhananjay Munde : 250 दिवस बहिणीने आधार दिला, तास न् तास माझ्याजवळ बसत... : धनंजय मुंडेंनी सांगितली भावनिक गोष्ट

Dhananjay Munde Dasara Melava Beed : भगवान गडावरील मेळाव्या वेळी भाषण करताना धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खदखद उघड केली आणि बहिणीने दिलेल्या आधारासंदर्भात भावनिक गोष्ट सांगितली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

सावरगाव येथील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे एकत्र मंचावर आले होते. भगवान गडावर एकाचवेळी तिन्ही भावंडं एकत्र आल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी भाषण करताना धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खदखद उघड केली आणि बहिणीने दिलेल्या आधारासंदर्भात भावनिक गोष्ट सांगितली.

धनंजय मुंडे म्हणाले, “250 दिवस माझी मानसिक अवस्था खूपच वाईट झाली होती. त्या काळात माझ्या बहिणीने मला आधार दिला. ती तासन्‌तास माझ्या जवळ बसायची. माझ्या विरोधात मीडिया ट्रायल सुरू होतं, कोर्टात प्रकरण गेलं. पण अखेर कोर्टाने मला क्लीनचिट दिली. उलट माझ्यावर आरोप करणाऱ्यांना लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तरीसुद्धा आज मी शिक्षा भोगतोय, असं मला वाटतं.”

Dhananjay Munde
Pankaja Munde Dussehra Melava: जानकर, धनुभाऊ ते लक्ष्मण हाके... दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंच्या स्टेजवर OBC नेत्यांची गर्दी

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “मी सध्या मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहू. शेतकरी आणि शेतमजुरांना मदत मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

Dhananjay Munde
Pankaja Munde Dasara Melava : धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले! पाठींब्यासाठी...

भगवान गडाच्या दसरा मेळाव्याचा वारसा गोपीनाथ मुंडेंनी (Gopinath Munde) देशाच्या नकाशावर नेला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. “हा मेळावा फक्त घोषणा करणाऱ्यांना कळणार नाही. दसऱ्याच्या दिवशी इथे येऊन विचारांची देवाणघेवाण करायची हीच खरी परंपरा आहे. साहेब गेल्यावरही ही परंपरा अखंड सुरू ठेवली गेली, याचा मला अभिमान वाटतो,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com