Manoj Jarange sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Decision : मनोज जरांगेंचा सरकारचे टेन्शन वाढवणारा निर्णय, मुंबईला रवाना होण्यापूर्वी उपचार नाकारले, पाणी बंद

Manoj Jarange Refuses Medical Treatment : मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी पाणी देखील घेतले नाही. तसेच सलाईन देखील लावण्यास नकार दिला.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईकडे रवाना होणार आहे. आझादा मैदानावर ते आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिलेली नाही. तरीदेखील जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत.

मागील 16 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. दरम्यान,उपोषणादरम्यान ते उपचार घेत होते, सलाईन देखील सुरू होते. मात्र, सरकारचे टेन्शन वाढवणारा निर्णय घेत त्यांनी काल रात्री त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून सलाईन देखील लावून घेतली नाही. पाणी देखील बंद केले आहे. आज (सोमवार) ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या विषयी 'टीव्ही 9 मराठी'ने वृत्त दिले आहे.

आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकराली असली तरी जरांगे पाटील यांच्याकडून कोर्टात जाण्याच निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी न्यायालयाने जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालय आंदोलन करण्यास परवानगी देईल, असा विश्वास मराठा आंदोलक व्यक्त करत आहेत.

चार दिवसांचा प्रवास अन् मुंबईत येणार

उद्या (मंगळवार) सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघणार आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव असतील. या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे. त्यानंतर दुसरा मुक्काम अहिल्यागर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि तिसरा मुक्काम हडपसरमध्ये असेल. चौथा मुक्काम खोपोली आणि पाचव्या दिवशी 19 सप्टेंबरला ते आझाद मैदानावर पोहोचत आंदोलन सुरू करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT