Maratha reservation latest news : वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणावर खलबतं; सीएम फडणवीसांच्या दरबारी सामंत-लाड दाखल; राजकीय हालचालींना वेग!

Manoj Jarange Patil protest News : सीएम देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 16 दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. त्यांनी शनिवारी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मुंबईमधील आपल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला सरकारने परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मात्र त्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. मात्र, आता राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत बैठक सुरू आहे. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. यातून कोणता निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यावर चर्चा देखील झाली आहे. त्यांचे उपोषण सोडवावे यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, यासाठी समजावले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका बसला आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे हे उपोषण करणार होते. पण आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आमित सहानी या प्रकरणात जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्याचा दाखला देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. ही बातमी धडकल्यावर जरांगे पाटील हे सुद्धा इरेला पेटल्याचे दिसून आले. त्यांनी मुंबईत जाणारच असा खणखणीत इशारा सरकारला दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com