Manoj Jarange Patil addressing media while playing leaked audio clips amid his open challenge to Dhananjay Munde for a CBI and narco test. Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange on Dhananjay Munde : मनोज जरांगेंनी टाकला 'ऑडिओ क्लिप बॉम्ब'; दीड-दोन कोटी, धनंजय मुंडे अन्...

Manoj Jarange Patil Responds to Dhananjay Munde’s Challenge : धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळताना सर्व माणसे त्यांचीच असल्याचा दावाही केला. आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

Rajanand More

Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्याला मुंडे यांनीही प्रत्युत्तर देत या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. सीबीआय चौकशी सुरू झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्वांची नार्को आणि ब्रे मॅपिंग टेस्ट करण्याची जोरदार मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद संपताच मनोज जरांगे पाटील यांनी काही मिनिटांत त्यांना प्रत्युत्तर देत त्यांचे चॅलेंज स्वीकारले आहे. नार्को टेस्टसाठी मी पहिला अर्ज करणार, असे त्यांनी जाहीर करून टाकले. तसेच आपण सीबीआय चौकशी आणि ब्रेन मॅपिंग टेस्टलाही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंडे यांनीच आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाचा पुनर्रच्चारही जरांगे यांनी यावेळी केला.

मुंडेंनी जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळताना सर्व माणसे त्यांचीच असल्याचा दावाही केला. आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. बीडमधील सर्व पोलीस यंत्रणा जरांगेंना घाबरून राहत असल्याचे सांगत मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बोट दाखविले. बीडमधील सभेत ईडब्ल्यूएस की ओबीसी आरक्षण हा प्रश्न केल्याचा जरांगेंना राग आल्याने माझ्यावर आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केला.

जरांगे यांनीही मुंडे यांच्यावर पलटवार करताना दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या. एका ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींमध्ये दीड-दोन कोटींच्या देवाणघेवाणीचे संभाषण होते. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचेही नाव घेतले होते. हे आपल्या हत्येच्या सुपारीचे पैसे असल्याचा दावा जरांगेंनी केला. संभाषण करत असलेल्या दोन्ही व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी असल्याचा दावाही त्यांनी केला.

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती थेट धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलत असल्याचे जरांगे यांनी सांगितले. यामध्ये आपल्या ताफ्यामध्ये त्यांची गाडी घुसवून आपल्या अंगावर घालण्याचा कट रचण्याचे बोलणे झाल्याचा दावा जरांगेंनी केला. हे दावे करताना जरांगे यांनी आता याप्रकरणात थांबणार नसल्याचा इशाराही दिला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT