Voters queue up at polling booths during the first phase of Bihar Assembly elections, marking a record turnout that worries top leaders.
Voters queue up at polling booths during the first phase of Bihar Assembly elections, marking a record turnout that worries top leaders.Sarkarnama

Bihar Election voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातच गेम फिरला; मोदी-नितीश कुमारांना मोठा झटका बसणार?

Rising Voter Turnout in Bihar Election 2025: A Political Game Changer : निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदारयाद्यांमधील घोळ आणि बेरोजगारीचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता.
Published on

Why the Increased Voting Percentage Worries BJP and JD(U) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी तब्बल 64.69 टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा हा आकडा साडे आठ टक्क्यांनी अधिक आहे. यावरूनच बिहारमध्ये सत्ता कुणाची येणार, याबाबत चर्चांना उधाण आले. वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार की विरोधकांना सुखद धक्का देणार, यावरून तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे. निवडणुकीआधीच मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा मुद्दा गाजला. लाखो मतदार विविध कारणांनी यादीतून वगळण्यात आले. जवळपास 20 वर्षांहून अधिक काळानंतर मतदारयादी शुध्द झाल्याचा दावा भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आला. त्यानंतर झालेल्या मतदानाने आतापर्यंतचा मतदानाचा रेकॉर्ड मोडला.

यंदा एवढे मतदान का झाले, यावरून चर्चा झडू लागल्या आहेत. सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांमुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे सरकारच्या बाजूने मतदान केले असावे, अशीही चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अजूनही मतदारांमध्ये विश्वास असल्याने त्यांच्याकडे पाहून मतदारांनी आपले माप एनडीएच्या पदरात टाकल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे विरोधकांच्या आशा पल्लवित करणाऱ्या चर्चांनाही उधाण आले आहे.

Voters queue up at polling booths during the first phase of Bihar Assembly elections, marking a record turnout that worries top leaders.
Election update : निवडणूक आयोगाला आश्चर्याचा धक्का; बिहारमध्ये मतदान सुरू असतानाच आयुक्तांना थेट दक्षिण आफ्रिकेतून फोन

निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदारयाद्यांमधील घोळ आणि बेरोजगारीचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. राहुल गांधींकडून सातत्याने Gen-Z ला आवाहन केले जात आहे. याच नवमतदारांसह तरूणाईने इंडिया आघाडीच्या बाजूने जोर लावल्याचेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्याचप्रमाणे नितीश कुमार यांची पलटूराम अशी तयार झालेली प्रतिमाही विरोधकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून आघाडीने आधीच मोठा डाव टाकल्याचीही चर्चा होती. आजही तरूणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यांच्याकडे पाहून तरूणाईने मतदान केले असावे, असे तर्क लावले जात आहेत.

काय आहे सत्तेचा इतिहास?

मतदानाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर जेव्हा-जेव्हा मतदानाचा टक्का 5 हून अधिक वाढला आहे, तेव्हा सत्तांतर झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील वाढलेले मतदान एनडीएचे टेन्शन वाढविणारे म्हणता येईल. 1967 मध्ये मतदान वाढल्यानंतर सत्ता बदलली होती. त्यानंतर 1980 मध्येही हाच पॅटर्न दिसला. 1977 मध्ये 50.5 टक्के मतदान झाले होते. 1980 मध्ये हा आकडा 57.3 टक्क्यांवर पोहचला अन् सत्ताबदल झाला. 1990 मध्येही हाच पॅटर्न होता.  

Voters queue up at polling booths during the first phase of Bihar Assembly elections, marking a record turnout that worries top leaders.
Fadnavis government : सहकार अन् पणन मंत्र्यांमध्ये संघर्ष? विभागांच्या कामकाजाबाबत फडणवीसांनी मोठं पाऊल उचललं...

2010 नंतर 2015 आणि 2020 मध्येही मतदान वाढले. मात्र, वाढलेल्या मतदानाचा टक्का 5 टक्क्यांहून कमी होता. त्यामुळे नितीश कुमार यांना सत्ता मिळत गेली. यावेळी मात्र पहिल्या टप्प्यात साडे टक्के मतदान वाढले आहे. हाच मुद्दा एनडीएचे टेन्शन वाढविणारा ठरला आहे.

मागील निवडणुकीत काय स्थिती?

यंदा पहिल्या टप्प्यात झालेल्या 121 मतदारसंघातील मतदानाचा निकाल पुढील आठवड्यात समजेलच. पण मागील निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीचा दबदबा राहिला होता. यंदा याच मतदारसंघांमध्ये भरघोस मतदान झाले आहे. मागील निवडणुकीत आघाडीला 61 तर एनडीएला 59 जागा मिळाल्या होत्या. आरजेडीला 42 आणि भाजपला 32, जेडीयूला 23 तर काँग्रेसला आठ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र आघाड्यांचं राजकारण बदललेलं आहे. मागील निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा एनडीएमध्ये तर एनडीएसोबत असलेले मुकेश साहनी आघाडीसोबत आहेत. त्याचाही परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणार, हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com