Manoj Jarange Patil press conference today Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Protest : शेवटच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात! मोठी घोषणा करत तारीखही सांगितली!

Manoj Jarange Patil announces final protest: 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. त्या विरोधात आता जरांगे पाटील हे मैदानात उतरले असून ते आंदोलन करणार आहेत.

Roshan More

Maratha Reservation News : हैद्राबद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर शिंदे समितीने मराठा-कुणबी नोंदींचा शोध घेतला होता. त्यामध्ये तब्बल 58 लाख नोंदी सापडल्या होत्या. मात्र, या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. त्या विरोधात आता मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले असून ते आंदोलन करणार आहेत.

'आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. तीन वर्ष हा संघर्ष सुरू आहे. आता मराठ्यांचे प्रश्न बाकी ठेवायचे नाहीत. आपल्या 58 लाख नोंदी सापडल्या. सरकार 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देत नाही. ही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला हे निर्णायक आंदोलन करायचे आहे.', अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

२९ ऑगस्टला एकाही माणसाने घरी राहायचे नाही, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही, असे त्यांनी सांगितले. ओबीसीच्या सर्व सोयी सुविधा मराठ्यांना लागू करण्यात आल्याचा जीआर काढला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. तसेच सातारा, पुणे गॅझेट का लागू केले नाही, असा सवाल त्यांनी केला.

पक्ष बाजुला ठेऊन आंदोलनात उतरण्याचे आवाहन देखील त्यांनी मराठा समाजातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना केले. ते म्हणाले, नेत्यांनी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या बाजुनेच बोलावे. प्रमाणपत्र मिळाली तर त्याचा फायदा तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात असला तरी तुमच्याच लेकांना होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT