OBC Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर लक्ष्मण हाके आक्रमक; इशारा देत म्हणाले, '...तर आम्ही ढेकळात बसू'

OBC Reservation News : आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Laxman Hake Vs Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणी रखडल्याचा आरोप करत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मे महिन्याच्या या रखरखत्या आणि कडक उन्हात, कोणत्याही प्रकारचा मंडप किंवा सावली न घेता जरांगे पाटील उघड्यावर बाजावर बसून उपोषण करत आहेत. आता या आंदोलनाला आंदोलनाद्वारेच उत्तर देण्याचा निर्णय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे.

उपोषण सुरू करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, सरकारने दिलेल्या आश्वासनांना आता अनेक महिने उलटून गेले आहेत. आम्ही सरकारला पुरेसा वेळ दिला, मात्र अद्यापही जमिनीवर ठोस काम झालेले नाही. प्रमाणपत्रे वाटपात अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहेत. हे आंदोलन आरपारचे असून, आता चर्चा नाही तर थेट अंमलबजावणी हवी.' असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा हिशेब: सरकारने काय दिलं, समाजाला अजून काय हवं?

दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली असून, 95 टक्के गुन्हे मागे घेतल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना जलद गतीने काम करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. हे उपोषण करू नये अशी विनंती देखील विखे पाटील यांनी केली होती.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Maratha Reservation : 'सरकार म्हणतंय आरक्षण दिलं, मग प्रमाणपत्र वैधता का देत नाही?' मराठा समाजाची फसवणूक करू नका, छावा संघटनेकडून इशारा

आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा हिशेब: सरकारने काय दिलं, समाजाला अजून काय हवं?

याबाबत माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले, 'मनोज जरांगे यांनी जे काही आंदोलन सुरू केले आहे, हे आंदोलन जर सुरूच राहणार असेल आणि ओबीसीच्या ताटातले त्यांच्या हक्क अधिकाराचे जर आरक्षण हिरावून घेतले जाणार असेल, तर आम्ही उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक असे आंदोलन करणार आहोत.'

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेट लागू होऊनही कुणबी प्रमाणपत्राचा तिढा सुटेना; जरांगे पाटलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा! सरकारचं टेन्शन वाढणार?

या आंदोलनामध्ये जरांगे हे बाजावर बसले आहेत तर आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करणार आहोत. उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे हाके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil On Vikhe Patil : मराठा समाजात भांडण लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीचे अध्यक्ष केले का? जरांगे पाटलांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com