Devendra Fadnavis-Manoj jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Video Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील अखेर मनातले बोलले, 'भाजपला सत्तेत येऊ देऊ नका'

Manoj Jarange Devendra Fadnavis : 15 ते 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मला जेलमध्य टाकून मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी आज (बुधवारी ) त्यांचे उपोषण स्थगित केले. उपोषण स्थगित करत असताना मला जेलमध्य टाकून मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

' मला जेलमध्ये मारण्याचा डाव आहे. काही झाले तरी मराठा समाजाने भाजपला कधीच सत्तेत येऊ देऊ नका.', असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधी आणि न्याय विभाग आहे. मला 15 ते 16 वर्षापू्र्वीच्या प्रकरणात अटक वाॅरंट काढले आहे. न्यायाधीश हा फडणवीस यांचा पाहुणा असल्याचे मला सांगण्यात आले आहे. गृह विभाग देखील फडणवीसांकडे आहे. त्याच्याद्वारे मला अडकवण्याचा डाव आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

उपोषण का स्थगित केले?

जरांगे म्हणाले, "मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही.''

माझा काही संबंध नाही

मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले आहेत. अशा प्रकरणात नोन बेलेबल वाॅरंट निघते मात्र न्यायालयात गेल्यानंतर ते रद्द देखील होतो. आमच्या विरोधात देखील अशी वाॅरंट निघाली आहेत. उपोषणामुळे ते काहीही बोलत आहेत. मागे ते म्हणाले होती उपोषणामुळे त्यांच्यावर परिणाम झाला होता. आत्ता देखील तसेच झाले असेल असे आपण समजू, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT