Video Prasad Lad : 'विधानसभेत येऊन दाखव', एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना चॅलेंज

Prasad Lad Challenge Manoj Jarange Patil : प्रसाद लाड यांनी या आधी देखील एक व्हिडिओ प्रसारीत करत मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते.जरांगे उपोषण करत आहेत मात्र त्यांचा मार्ग भरकटला असल्याचे टीका लाड यांनी केली होती.
Manoj Jarange, Prasad Lad
Manoj Jarange, Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Prasad Lad News : मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आज (बुधवारी) स्थगित केले. उपोषण स्थगित करताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी विधानसभेत 30-40 आमदार हवेत, अशी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरागेंच्या याच प्रतिक्रियेवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना डिवचले आहे. जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड यांनी विधानसभेत येऊन दाखव, असे म्हणत विधानसभेत 288 आमदार उभे करण्याचे चॅलेंज मनोज जरांगे-पाटील यांना दिले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. मनोज जरांगे यांची राजकीय भाषा ही महाविकास आघाडीची भाषा असल्याचा हल्लाबोल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.

प्रसाद लाड यांनी या आधी देखील एक व्हिडिओ प्रसारीत करत मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी उपोषण करत आहेत मात्र त्यांचा मार्ग भरकटला असल्याचे टीका लाड यांनी केली होती.

Manoj Jarange, Prasad Lad
BJP Vs Manoj Jarange Patil : मराठा समाजाला 'OBC' तून आरक्षण देण्याची कुणाची हिंमत नाही; भाजप आमदाराच्या विधानानं चर्चेला उधाण

भाजप आमदारांकडून जरांगे टार्गेट

मनोज जरांगे यांच्या विरोधात उघडपणे न बोलणारे भाजप आमदारांनी मात्र लोकसभा निवडणुकीनंतर थेट जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचे दिसते. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, परिणय फुके हे मनोज जरांगेंना टार्गेट करत आहेत. जरांगेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे म्हणून चॅलेंज देखील करत आहेत.

जरांगेंनी उपोषण का केले स्थगित?

उपोषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नसल्याचे सांगितले. सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ देत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Manoj Jarange, Prasad Lad
Manoj Jarange Patil : मंत्र्यांच्या बैठकीतील इत्यंभूत माहिती जरांगेंपर्यंत पोहोचवणारा ‘तो आमदार’ कोण?

भाऊ, भाऊ करणारे लाड एकेरीवर

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. मात्र, प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांनी आपल्याला शिव्या दिल्या असल्या तरी आपण त्यांची पोलिसांमध्ये तक्रा करणार नसल्याची भूमिका घेतली होती.

तसेच व्हिडिओद्वारे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख माझे भाऊ, मोठे भाऊ असा उल्लेख प्रसाद लाड करत होते. मात्र आज मनोज जरांगे यांचा उल्लेख करताना अरे तुरेची भाषा करत लाड यांनी जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com