Manoj Jarange Patil Mumbai Morcha sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Appeal : मुंबईत न येणाऱ्या मराठ्यांना मनोज जरांगेची हात जोडून विनंती, फक्त येवढंच करा अन्...

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा काढण्याचे जाहीर करत मार्ग सांगताना मुंबईला न येणाऱ्या मराठ्यांना भावनिक आवाहन केले आहे.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई चलोची हाक दिली आहे. आज आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग जाहीर केला. पहिला मुक्काम बीडमधील पाटोदा, दुसरा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तर तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसरमध्ये होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे होणार आणि त्यानंतर आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगितले.

जरांगे पाटील यांनी ही घोषणा करत असताना मुंबईला न येणाऱ्या मराठा बांधवांकडे हात जोडून विनंती केली की, 'एक दिवस जातीसाठी द्यायचा आहे. जे मराठे मुंबईला येणार नाहीत. त्यांनी आम्ही ज्या रस्त्यावरून जाणार आहोत, त्या रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी यायचे आहे.सहकुटुंब यायचं आहे.'

'ज्या नोकरदार, व्यायवसायिक, राजकारणी, शेतकरी मराठ्याला मुंबईला येता येणार नाही त्यांना हात जोडून विनंती आहे की, जी तारीख सांगितली त्या तारखेला रस्त्यावर यायचा आहे. आणि मुंबईला जाणाऱ्या आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे.', असे देखील ते म्हणाले.

फडणवीस मराठ्यांना आडवू नका...

मनोज जरांगे पाटील म्हणाले, फडणवीससाहेब मराठ्यांना आडवू नका. मला माहिती आहे की, तुम्ही आडवणार नाही. जर का आडवलं तर मराठ्यांचा मतदान तुटलं म्हणून समजा. न्यायदेवात आमच्या बाजुने आहे त्यांनी आम्हाला आंदोनल करण्यासाठी परवानगी दिली आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT